'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:01 IST2025-09-03T15:53:42+5:302025-09-03T16:01:32+5:30

Weird Rituals : हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे.

Village where husbands remarry just because wife gets pregnant know reason | 'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा

'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा

Weird Rituals : भारतीय कायद्यानुसार हिंदू धर्म लग्न पद्धतीनुसार, व्यक्तीला एक लग्न करण्याची परवानगी आहे. पण भारतात एक राज्य आहे ज्यातीस गावात जिथे पुरूष पहिली पत्नी गर्भवती असताना दुसरं लग्न करतात. सामान्यपणे या दिवसांमध्ये पतीची पत्नीला साथ हवी असते. पण इथे पुरूष दुसरं लग्न करण्याच्या मागे लागतात. बरं त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे गर्भवती पत्नीच पतीला हे दुसरं लग्न करण्यासाठी परवानगी देते. हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे.

देरासर गावात वर्षानुवर्षे पती पत्नी गर्भवती झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. बरं पहिली पत्नी किंवा समाजही त्याला काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी. पाणी हेच कारण आहे ज्यामुळे गर्भवती पत्नीही आनंदाने पतीचं दुसरं लग्न लावून देते. आता तुम्ही म्हणाल की, हे कोणतं कारण आहे? चला पाहुयात एका अशा गावाबाबत जिथे केवळ आणि केवळ पाण्यासाठी एक गर्भवती पत्नी पतीचं दुसरं लग्न लावून देते.

गावात एखाद्या व्यक्तीची पत्नी गर्भावती राहते, तेव्हा तिचा पती लगेच दुसरं लग्न करतो. या लग्नावर त्याच्या पत्नीला किंवा गावातील कुणालाही आक्षेप नसतो. कारण असं आहे की, या गावात किंवा आजूबाजूला पाण्याची मोठी समस्या आहे. अशात महिला दूरदूर जाऊन पाणी आणतात. पण महिला जेव्हा प्रेग्नेंट होतात तेव्हा पाणी आणू शकत नाहीत. अशात पती पाण्यासाठी दुसरं लग्न करतो.

या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. पुरूष तर घरातील काम करत नाहीत. अशात महिलाच चेहरा झाकून दूरदूर पाणी भरण्यासाठी जातात. पण जेव्हा घरातील महिला गर्भवती होते तेव्हा तिला भरणं अवघड होतं. अशात महिलेचा पती दुसरं लग्न करतो. जेणेकरून घरात पाणी आणता यावं. गर्भवती महिला घरातील काम करते आणि दुसरी महिला पाणी भरायला जाते. या लग्नावरून पहिल्या पत्नीला कोणतीही समस्या नसते. 

Web Title: Village where husbands remarry just because wife gets pregnant know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.