Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 16:41 IST2023-05-19T16:41:01+5:302023-05-19T16:41:57+5:30
एका कंपनीने उत्साही जोडप्यांसाठी Space Wedding ची सुविधा सुरू केली आहे. पहिले 1000 तिकीटे बुकही झाली.

Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..?
आजकाल डेस्टिनेशन वेडिंग (Destination weddings) अगदी कॉमन गोष्ट झाली आहे. नयनरम्य ठिकाणी आपल्या प्रिय व्यक्तीशी लग्न करणे, हा सध्याचा ट्रेंड बनला आहे. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे डेस्टिनेशन वेडिंग होत असते. पण, आता फक्त पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही डेस्टिनेशन वेडिंग करता येणार आहे. एका कंपनीने अशाप्रकारची ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत चक्क अंतराळात लग्न करता येणार आहे.
स्पेस पर्स्पेक्टिव्ह नावाच्या कंपनी अंतराळात जोडप्यांची लग्न लावणार आहे. ते जोडप्यांना पृथ्वीचे सर्वोत्तम दृश्य पाहण्यासाठी एका काचेच्या खिडक्या असलेल्या महाकाय कार्बन न्यूट्रल बलूनमधून अंतराळात पाठवतील. कंपनीच्या नेपच्यून स्पेसशिपमधून हा 6 तासांचा प्रवास होईल. हे बलून जोडप्याला पृथ्वीपासून 100,000 फूट उंचीवर घेऊन जाईल. 2024 मध्ये याची सुरुवात होणार असून, 1000 तिकिटांची बुकिंगही झाली आहे. यासाठी प्रति व्यक्ती 1 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, हे बलून अतिशय आलिशन असणार आहे. यात आठ प्रवासी आणि पायलट आरामात प्रवास करू शकतील. या बलूनमध्ये जोडप्यांना बार, टॉयलेट-बाथरुम यांसह सर्व सुखसोई मिळतील. याशिवाय, बलूनमध्ये मोठ्या आकाराच्या 360 खिडक्या असल्यामुळे जोडप्याला अंतराळाचे नयनरम्य दृष्य पाहायला मिळेल. हाय स्पीड वाय-फाय कनेक्शन असल्यामुळे तुम्हाला अंतराळातून तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रांनाही कॉल करता येईल.