शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 12:39 IST

तुम्ही सर्वांनी दिपीकाचं घुमर गाण्यावरील नृत्य पाहीलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं असेल. या गोरीलाचा त्याच गाण्यावरील परफॉर्मन्स पाहीलात का ?

ठळक मुद्देपद्मावतीच्या चित्रीकरणापासून सुरु असलेला वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. मात्र त्यातील घुमर गाण्यासाठी दीपिकासहीत चित्रपटाच्या टीमचंही फार कौतुक होतंय.दीपिकाच्या घुमरसहीत या गोरीलाचा गुमरही सोशल मीडियावर थैमान घालतोय.

मुंबई : सध्या जोरदार विरोधाचा सामना करत असलेल्या पद्मावती या चित्रपटातील घुमर हे गाणं युट्यूबवर चांगलंच गाजतंय. दीपिका पदुकोणची एक वेदळीच अदाकारी या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आली. या गाण्यातूनच या चित्रपटातील सेटची भव्यता आणि संजय लीला भन्साळी यांनी केलेला खर्च दिसतोय. घुमर नृत्यासाठी दीपिकाचं चांगलंच कौतुकही झालं. म्हणूनच की काय दीपिकाला टक्कर देण्यासाठी चक्क गोरिल्लानेही या गाण्यावर ठेका धरलाय. घुमरच्या गाण्यावर ठेका धरणाऱ्या एका गोरिल्लाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. हा व्हिडिओ स्पूफ व्हिडिओ असला तरी नेटिझन्सने या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिलाय.

पद्मावतीसंदर्भात अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पद्मावती चित्रपट चित्रीकरणापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रर्दशित होणार होता. मात्र निर्मात्यांनी आता ही तारीख पुढे ढकलली आहे. पण या चित्रपटातील घुमर आणि एक दिल एक जान हे गाणं प्रेक्षकांनी चांगलंच उचलून धरलंय. घुमर हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. दीपिका पदुकोणला टफ देण्यासाठी घुमर या गाण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पण दीपिका पदुकोणसमोर सगळेच फिके पडले. मात्र तिला आव्हान देण्याकरता चक्क गोरिल्लाने उडी मारलीय आणि त्याने हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेललंसुद्धा. सोशल मीडियावर व्हायरल होणारा गोरिलाचा घुमर हा डान्स एक स्पूफ व्हिडिओ असला तरीही नेटिझन्सने या नृत्याचा चांगलाच आस्वाद घेतलाय. एका पाण्याच्या टबमध्ये गोरिल्लाने घुमर गाण्यावर घातलेला धुमाकूळ पाहता यापुढे दीपिका पदुकोणही फिकी पडतेय अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

खरंतर गोरिल्ला टबमधील डान्स काही महिन्यांपूर्वीच समोर आला होता. मात्र आता कर्की क्लोथ्स ब्रँडने या व्हिडिओला स्पूफ व्हिडिओ बनवून तुफान व्हायरल केला. आतापर्यंत या व्हिडियोला १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मर्सलिस पार्क येथील डल्लास झूमधील हा गोरिल्ला आहे. २०१७ च्या सुरुवातीला हाच व्हिडिओ एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्धीस आला होता. मात्र आता घुमरचा फिव्हर बघता कर्की क्लोथ्स ब्रँडने हा याला घुमरचं गाणं देऊन पुन्हा शेअर केलाय.

सौजन्य - www.india.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयDeepika Padukoneदीपिका पादुकोणPadmavatiपद्मावतीRanveer Singhरणवीर सिंगSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी