VIDEO : हवेत ड्रोन उडताना पाहून कावळ्याने केला हल्ला, बघा त्यानंतर काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:42 IST2021-09-24T18:37:59+5:302021-09-24T18:42:06+5:30
एका ग्राहकाने या डिलिव्हरीच्या माध्यमातून जेवण मागवलं होतं. तो त्याच्या जेवणाची वाट बघत होता. पण अचानक भलतंच काहीतरी घडलं.

VIDEO : हवेत ड्रोन उडताना पाहून कावळ्याने केला हल्ला, बघा त्यानंतर काय झालं...
(Image Credit : zeenews.india.com)
खुल्या आकाशात तुम्ही पक्ष्यांना किंवा विमानाला उडताना नेहमी पाहिलं असेल. पण अलिकडे काही देशांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फूड डिलिव्हरीही केली जात आहे. आकाशातील पक्षीही हे ड्रोन बघून हैराण आहेत की, हे आहे तरी काय? अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात बघायला मिळाली. इथे एका पक्ष्याने अचानक उडणाऱ्या ड्रोनवर हल्ला केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. एका ग्राहकाने या डिलिव्हरीच्या माध्यमातून जेवण मागवलं होतं. तो त्याच्या जेवणाची वाट बघत होता. पण अचानक भलतंच काहीतरी घडलं.
आपल्या ऑर्डरची वाट पाहत असलेल्या ग्राहकाने पाहिलं की, ड्रोनवर एका कावळ्याने हल्ला केला. एका पक्ष्यासारख्या दिसणाऱ्या ड्रोनवर जसा हल्ला झाला त्याने त्याच्या मोबाइल कॅमेरात ही घटना रेकॉर्ड केली. कावळ्याने आपल्या चोचीने ड्रोनवर हल्ला केला. नंतर त्याच्या लक्षात आलं की, पुन्हा पुन्हा चोच मारूनही काही होत नाही तर कावळा उडून गेला. त्यानंतर ड्रोनने फूड घरासमोर डिलिव्हर केलं. ही सगळं ग्राहकाने कॅमेरात रेकॉर्ड केलं. (हे पण बघा : 'या' फोटोत लपलेला साप शोधून भलेभले थकले, तुम्हीही करा प्रयत्न; सापडला तर माराल आनंदाने उड्या!)
विंगसोबत पार्टनरशिप करून गुगल ऑस्ट्रेलिच्या कॅनबरामध्ये एअर डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली गेली आहे. ड्रोन डिलिव्हरीमध्ये कॉफी, जेवण, मेडिसिन आणि हार्डवेअर यांचा समावेश आहे. कॅनबराच्या आजूबाजूला पक्ष्यांकडून असंच करण्यात आल्याने ड्रोन सेवेवर बंदी घालण्यात आली आहे.