OMG! एका बाइकवर बसले तब्बल १२ जण; VIDEO पाहून चक्रावले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:23 IST2021-09-13T15:18:58+5:302021-09-13T15:23:40+5:30
हा व्हिडीओ जेवढा मनोरंजन करणारा आहे तेवढाच धोकादायक आहे. गाडीवर बसलेली लहान मुलं 'बचपन का प्यार' हे गाणं गात गात प्रवास करत आहेत.

OMG! एका बाइकवर बसले तब्बल १२ जण; VIDEO पाहून चक्रावले लोक
सोशल मीडियावर नेहमीच एकापेक्षा एक भारी व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ आपल्याला हसवतात तर कधी हे व्हिडीओ हैराण करणारे असतात. अनेक व्हिडीओ पाहिल्यावर तर आपला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत एक व्यक्ती त्याच्या बाईकवर तब्बल १२ जणांना घेऊन जाताना दिसला. हा व्हिडीओ जेवढा मनोरंजन करणारा आहे तेवढाच धोकादायक आहे. गाडीवर बसलेली लहान मुलं 'बचपन का प्यार' हे गाणं गात गात प्रवास करत आहेत.
हा व्हिडीओ बघायला जरा भारी वाटत असला तरी अनेकांच्या जीवाशी खेळणारा आहे. या व्यक्तीने त्याच्या बाईकवर १२ लहान मुली-मुलं बसवले आणि वेगाने गाडी चालवत आहे. त्याने लहान मुलांना पेट्रोलची टाकी, मडगार्ड, अंगा-खांद्यावर बसवलं आहे.
या व्हिडीओला व्ह्यूज आणि लाइक्स भरपूर मिळत असले तरी अनेकांनी यावर नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी लिहिलं आहे की, या व्यक्तीला धरून मारलं पाहिजे. तर एकाने लिहिलं की, स्टंटच्या नादात लहान मुलांच्या जीवाशी तो खेळत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे.