महिलेला अनोळखी व्यक्तीकडून मिळालं लग्नाचं प्रपोजल, 16 लाख रूपयेही देणार होता; पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:01 IST2023-11-11T14:56:12+5:302023-11-11T15:01:00+5:30

एका व्यक्तीने मला 16 हजार पाउंडची ऑफर दिली. पण मी त्याला नकार दिला'. अखेर फ्रीटासने असं का केलं? चला जाणून घेऊ कारण...

Vanusa Freitas got marriage proposal from unknown person along with Rs 16 lakh refused instagram viral post | महिलेला अनोळखी व्यक्तीकडून मिळालं लग्नाचं प्रपोजल, 16 लाख रूपयेही देणार होता; पण....

महिलेला अनोळखी व्यक्तीकडून मिळालं लग्नाचं प्रपोजल, 16 लाख रूपयेही देणार होता; पण....

एका महिलेसमोर लग्नाचं प्रपोजल देणाऱ्यांची लाईन लागली आहे. इतकंच नाही तर एक व्यक्ती तर लग्नाच्या बदल्यात तिला हुंड्यात 15 लाख रूपये देण्यासही तयार आहे. हा खुलासा करणाऱ्या महिलेचं नाव वनुसा फ्रीटास (Vanusa Freitas) आहे. ती एक मॉडल आहे. ती म्हणाली की, 'मला लग्नासाठी अनेक प्रपोजल्स आले आहेत. एका व्यक्तीने मला 16 हजार पाउंडची ऑफर दिली. पण मी त्याला नकार दिला'. अखेर फ्रीटासने असं का केलं? चला जाणून घेऊ कारण...

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, वनुसा फ्रीटास तरूणांमध्ये चांगलीच फेमस आहे. त्यामुळेच अनेक लोक तिला लग्नासाठी प्रपोजल देत आहेत. नुकतंच एका व्यक्तीने लग्नासाठी तिला प्रपोजल दिलं होतं. ज्यामुळे तिचं डोकं फिरलं होतं. फ्रीटासने जे काही सांगितलं ते हैराण करणारं होतं.

हुंड्यात 300 उंट देण्याची ऑफर

फ्रीटास आपल्या दुबई ट्रीपला आठवत सांगते की, एका अनोळखी व्यक्तीने तिला लग्नात 300 उंट हुंड्यात देण्याची ऑफर दिली होती. ज्यांची किंमत फार जास्त आहे. पण नंतर समजलं की, त्या व्यक्तीला आधीच पाच पत्नी आहेत.

हे समजल्यावर फ्रीटास हैराण झाली आणि तिने त्याची ऑफर स्वीकारली नाही. ती म्हणाली की, 'माझ्या दुबई ट्रीपच्या दुसऱ्या दिवशीच मला ही ऑफर देण्यात आली होती. अनेक लक्झरी सुविधांचीही ऑफर दिली होती. पण मग मी सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या व्यक्तीची लग्नाची ऑफर नाकारली'.

मॉडलने खुलासा केला की, ऑफर नाकारल्या नंतर आजही ती त्या व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि त्यांच्यातील मैत्री कायम आहे. ज्या पद्धतीने  वानुसा फ्रीटासने ही स्थिती हॅंडल केली तिचे फॅन्स तिचं कौतुक करत आहेत.

Web Title: Vanusa Freitas got marriage proposal from unknown person along with Rs 16 lakh refused instagram viral post