कपल्सच्या बेरंग जीवनात रंग भरते ही महिला, दुसऱ्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघते; करते मोठी कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:20 IST2023-06-20T13:19:58+5:302023-06-20T13:20:24+5:30
Relationship : ती अश्लील कंटेट तयार करण्यापेक्षा कपल्सना मदत करण्यासाठी ओळखली जाते. हॅना स्वत:ला मेंटल हेल्थ एक्सपर्ट सोबतच रिलेशनशिप एक्सपर्ट असल्याचंही सांगते.

कपल्सच्या बेरंग जीवनात रंग भरते ही महिला, दुसऱ्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघते; करते मोठी कमाई!
Relationship : पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी या नात्यात प्रेमाला फार महत्व असतं. प्रेमाशिवाय जीवन अधुरं वाटू लागतं. अनेकदा जेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो तेव्हा ते डॉक्टर्स किंवा एक्सपर्ट्सचा सल्ला घेतात. जेणेकरून त्यांच्यातील वाद दूर होऊन त्यांचं जुनं प्रेम परत यावं. अमेरिकेत राहणारी महिला अशीच एक एक्सपर्ट आहे. जी कपल्सना रोमान्स करण्याच्या टिप्स देते. जेणेकरून त्यांच्या जीवनात पुन्हा प्रेमाचा रंग भरला जावा. पण हे काम करण्यासाठी ती इतके पैसे घेते ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
अमेरिकेच्या नॅशविलेमध्ये राहणारी हॅना निकोल (Hannah Nicole) एक ओन्लीफॅन्सवर (Onlyfans) कंटेंट क्रिएटर आहे. पण ती अश्लील कंटेट तयार करण्यापेक्षा कपल्सना मदत करण्यासाठी ओळखली जाते. हॅना स्वत:ला मेंटल हेल्थ एक्सपर्ट सोबतच रिलेशनशिप एक्सपर्ट असल्याचंही सांगते. ती तिच्या क्लाएंटना नाती सुधारण्यात मदत करते. महिलेने सांगितलं की, हे काम करून तिने अनेक लग्न मोडण्यापासून वाचवलेत.
लोकांना रोमान्स शिकवते हॅना
हॅना सांगते की, तिच्याकडे पुरूष नेहमीच ही समस्या घेऊन येतात की, त्यांची पत्नी किंवा प्रेयसीला आता रोमान्स करायचा नाहीये, किंवा ते इतक्या वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे की, नात्यातील प्रेमच संपलं आहे. बरेच पुरूष तिच्यासमोर हे बोलण्यात घाबरतात, त्यामुळे हॅना त्यांच्यासोबत ऑनलाइन बोलते.
तिने सांगितलं की, अनेकदा तर पुरूष तिला केवळ त्यांच्या आणि त्यांच्या पार्टनरच्या प्रायव्हेट क्षणांना लाइव्ह बघण्याचे पैसे देतात. त्यांची ईच्छा असते की, हॅनाने त्यांना रोमान्स करताना बघून रोमान्सच्या योग्य टिप्स द्याव्या.
किती करते कमाई?
2018 साली तिने ओन्लीफॅन्स अकाउंट सुरू केलं होतं. जिथे ती तिच्या सब्सक्रायबर्सच्या समस्या ऐकत होती. तिने सांगितलं की, केवळ पुरूषच नाही तर अनेक महिलाही तिला त्यांच्या समस्या सांगतात. डेली स्टार न्यूज वेबसाइटसोबत बोलताना हॅनाने तिच्या कमाईबाबतही खुलासा केला. पण तिने आकडेवारी स्पष्ट केली नाही. मात्र तिने हे सांगितलं की, दर महिन्याला ती 6 फिगर कमाई करते. म्हणजे एका अंदाजानुसार तिची महिन्याची कमाई 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे.