छप्परफाड! महिला पार्कमध्ये फिरायला गेली होती, सापडला महागडा हिरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:16 IST2021-10-07T17:15:41+5:302021-10-07T17:16:56+5:30
एका महिलेला अर्कांसस स्टेट पार्कमध्ये फिरत असताना एक ४.३८ कॅरेटचा दुर्मीळ पिवळा हिरा सापडला. अर्थातच महिलेचं नशीब माझ्या आणि तुमच्यापेक्षा जास्त चांगलं असेल.

छप्परफाड! महिला पार्कमध्ये फिरायला गेली होती, सापडला महागडा हिरा...
कधी पार्कमध्ये फिरताना तुम्हाला हिरा सापडला का? नाही ना! मात्र, कॅलिफोर्नियातील एका महिलेसोबत अशी घटना घडली आहे. एका महिलेला अर्कांसस स्टेट पार्कमध्ये फिरत असताना एक ४.३८ कॅरेटचा दुर्मीळ पिवळा हिरा सापडला. अर्थातच महिलेचं नशीब माझ्या आणि तुमच्यापेक्षा जास्त चांगलं असेल. तसं हे खरंच म्हणतात की, देणारा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो.
किती आहे किंमत?
यूएस टुडेच्या वृत्तानुसार, २३ सप्टेंबरल क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कमध्ये फिरताना नोरेन वेडबर्ग यांना जमिनीवर एक हिरा सापडला. नोरेन यांना अंदांजही नव्हता की, त्यांच्या हाती इतका किंमती हिरा लागला. त्या म्हणाल्या की, मी तो पिवळ्या रंगाच दगड उचलला कारण तो फारच साफ होता. चमकदार होता. असं मानलं जात आहे की, त्यांना जो हिरा सापडला त्याची किंमत २५०० ते २०,००० हजार डॉलर दरम्यान असू शकते.
तसा हा सगळा खेळ महिलेच्या नशीबाचा आहे. काही करामत या पार्कची सुद्धा आहे. Arkansas State Park जगातल्या अशा निवडक पार्कपैकी आहे जिथे सर्वसामान्य लोक हिरे शोधू शकतात. डायमंड्ससोबतच इथे काही मूल्यवान खनिजही मिळतात. पार्कमध्ये फिरणारे लोक हे सगळं घेऊ शकतात आणि विकूही शकतात.