लग्न करण्यासाठी इथे पुरूष चोरून आणतात दुसऱ्याची बायको, महिलेच्या सहमतीनेच होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:26 IST2025-07-12T15:22:33+5:302025-07-12T15:26:39+5:30
Marriage Weird Tradition : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथे दुसरं लग्न करण्यासाठी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरून आणणं बंधनकारक असतं.

लग्न करण्यासाठी इथे पुरूष चोरून आणतात दुसऱ्याची बायको, महिलेच्या सहमतीनेच होतं लग्न
Marriage Weird Tradition : जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक आदिवासी जमाती राहतात. हे लोक आजही त्यांच्या जुन्या परंपरा आणि प्रथा फॉलो करतात. त्यांची लाइफस्टाईल, कपडे, खाणं-पिणं आणि लग्नाचे रिवाजही वेगळे असतात. पश्चिम आफ्रिकेतील वोदाब्बे (Wodaabe) आदिवासी जमातही खूप वेगळी आहे. त्यांच्यातील लग्नाची परंपरा अनोखी आणि हैराण करणारी आहे. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथे दुसरं लग्न करण्यासाठी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरून आणणं बंधनकारक असतं.
वोदाब्बे जमातीमध्ये तरूण-तरूणींचं लग्न कुटुंबियांच्या सहमतीनं लावून दिलं जातं. घरातील लोक ठरवतात की, त्यांची मुलगी किंवा मुलाचं लग्न कुणासोबत होणार. पण जर एखाद्या व्यक्तीला दुसरं लग्न करायचं असेल तर त्यासाठी अजब नियम आहे. पत्नी चोरी करणं हा दुसऱ्या लग्नाचा नियम आहे.
दरवर्षी या लोकांकडून एक खास उत्सव साजरा केला जातो. ज्याला गेरेवोल असं म्हणतात. हा उत्सव खासकरून पुरूषांसाठी असतो. यात ते श्रृंगार करतात, रंगीबेरंगी कपडे घालतात आणि चेहऱ्यावर रंगरंगोटी करतात. त्यानंतर पारंपारिक नृत्य करत दुसऱ्यांच्या पत्नीना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. महत्वाची बाब म्हणजे या उत्सवाचा उद्देशच हा असतो की, जर एखादी दुसऱ्याची पत्नी दुसऱ्या पुरूषाकडे आकर्षित झाली तर ती त्याच्यासोबत पळून जाऊ शकते. हीच गोष्ट लग्न म्हणून स्वीकार केली जाते.
या समाजातील लोकांचं मत आहे की, एका पुरूषाचं आकर्षण, आत्मविश्वास आणि व्यक्तीत्व या गोष्टीवरून ठरतं की, तो किती महिलांना आकर्षित करू शकतो. दुसऱ्याची पत्नी चोरी करणं त्यांच्या संस्कृतीत एकप्रकारे परीक्षा आहे. पण त्यात महिलेची सहमती आवश्यक असते. एकीकडे जग आधुनिकतेकडे जात आहेत. या समाजातील लोक आजही आपल्या जुन्या परंपरा पार पाडतात.