व्हॅलेंटाईन डे स्पेशल; आगळा-वेगळा विक्रम; पाण्याखाली 4 मिनिटे चुंबन, गिनीज बुकमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 21:22 IST2023-02-14T21:19:46+5:302023-02-14T21:22:12+5:30
Underwater Kiss World Record: व्हॅलेंटाईन दिनी या जोडप्याच्या कारनाम्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल; आगळा-वेगळा विक्रम; पाण्याखाली 4 मिनिटे चुंबन, गिनीज बुकमध्ये नोंद
Underwater Kiss World Record: तुम्ही पाण्याखाली किती वेळ श्वास रोखू शकता? एक किंवा दोन मिनिटे...परंतू एखादा व्यक्ती पाण्याखाली 5-7 मिनिटे श्वास रोखू शकतो, त्यासाठी त्याला खूप सराव करावा लागेल. एका जोडप्याने हा सराव करुन एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या जोडप्याने पाण्याखाली सर्वाधिक काळ किस करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
Miles Cloutier आणि Beth Neale असे या जोडप्याचे नाव आहे. माइल्स कॅनडाची आहे, तर बेथ दक्षिण आफ्रिकेचा आहे. त्यांनी अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले आहे. या जोडप्याने एका स्विमिंग पूलमध्ये एकूण 4 मिनिटे 6 सेकंद एकमेकांना किस केले.
माइल्स आणि बेथच्या आधी सर्वात जास्त काळ पाण्याखाली चुंबन घेण्याचा जागतिक विक्रम एका इटालियन टीव्ही शोच्या होस्ट लो शो देईच्या नावावर नोंदवला गेला होता. त्यांनी एकमेकांना एकूण 3 मिनिटे 24 सेकंद चुंबन घेतले, परंतु माइल्स आणि बेथ त्यापेक्षा खूप पुढे गेले. विशेष म्हणजे दोघेही डायव्हर्स आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या जोडप्याने लग्न केलेले नाही, परंतु त्यांची एंगेजमेंट झाली आहे. त्यांना सुमारे दीड वर्षांची एक मुलगी देखील आहे, जिच्यासोबत हे जोडपे दक्षिण आफ्रिकेत राहतात. या जोडप्याने मालदीवमध्ये 'किस' करण्याचा विश्वविक्रम केला आहे. 'किस'चा विश्वविक्रम करणे या कपलसाठी सोपे नव्हते. यासाठी त्यांना आधी वॉर्म अप करावा लागला. त्यांनी तीन वेळा प्रयत्न केले, त्यानंतरच ते यात यशस्वी झाले.