बोंबला! लग्नाच्या दिवशी नवरीने केली अशी बॅटींग, नवरदेव ओरडतच जमिनीवर कोसळला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 13:08 IST2021-10-14T13:07:18+5:302021-10-14T13:08:17+5:30
ही घटना आहे ब्रिटनच्या कोर्नवॉलमधील एका हॉटेलातील. इथे एका कपलने आपल्या लग्नात वेगळं करण्यासाठी राउंडर्स गेम खेळण्याचा प्लॅन केला.

बोंबला! लग्नाच्या दिवशी नवरीने केली अशी बॅटींग, नवरदेव ओरडतच जमिनीवर कोसळला....
एक कपल त्यांच्या लग्नादरम्यान राउंडर्स गेम खेळत होतं. पण तेव्हाच त्यांच्यासोबत एक दुर्घटना झाली. दुर्घटना अशी की, आता त्यांच्या हनीमूनचेही वांदे झालेत. हे सगळं बघून नवरी-नवरदेवासोबत तिथे उपस्थित सगळे लोकही हैराण झाले. चला जाणून घेऊ काय झाली नेमकी भानगड...
ही घटना आहे ब्रिटनच्या कोर्नवॉलमधील एका हॉटेलातील. इथे एका कपलने आपल्या लग्नात वेगळं करण्यासाठी राउंडर्स गेम खेळण्याचा प्लॅन केला. राउंडर्स गेम क्रिकेटसारखाच असतो, ज्यात एक व्यक्ती एका लाकडी रॉडने बॉलला भिरकावतो. पण या गेममद्ये नवरीने असा काही शॉट मारला की, नवरदेव 'कोमात' केला.
झालं असं की नवरदेव मॅट चेस्टरफील्डने नवरी सारा चेस्टरफील्डसाठी बॉल फेकला. यावर साराने इतक्या जोरात फटका मारला की, बॉल थेट पती मॅटच्या प्रायव्हेट पार्टवर जाऊन लागला. बॉल लागताच तो ओरडत जमिनीवर पडला. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमद्ये नेण्यात आलं. जिथे समजलं की, त्याला गंभीर इजा झाली नाही. त्याला काही दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना २५ सप्टेंबरची आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला. ज्यात दिसलं की, नवरीने बॉलला असा फटका मारला की, तो पती मॅटच्या प्रायव्हेट पार्टवर जाऊन लागला. त्यानंतर वेदनेने तो जमिनीवर पडला. त्यावेळी लगेच कुणाच्या लक्षात आलं नाही. पण जेव्हा नवरदेव ओरडला तेव्हा लोक त्याच्याकडे धावून गेले.
ही घटना नवरीच्या बहिणीच्या कॅमेरात कैद झाली होती. तिने लग्नात झालेल्या या दुर्घटनेचा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.