पैशांच्या तंगीमुळे ड्रायव्हर महिलेने सोडलं होतं शिक्षण, पॅसेंजरने जे केलं ते वाचून कराल कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:00 IST2020-01-03T15:43:34+5:302020-01-03T16:00:38+5:30
अनेक लोकांना कौटुंबिक जबाबदारी किंवा इतरही काही कारणांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. इच्छा असून शिक्षण पूर्ण करता येत नाही आणि आवडत्या क्षेत्रात कामही करता येत नाही.

पैशांच्या तंगीमुळे ड्रायव्हर महिलेने सोडलं होतं शिक्षण, पॅसेंजरने जे केलं ते वाचून कराल कौतुक!
अनेक लोकांना कौटुंबिक जबाबदारी किंवा इतरही काही कारणांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. इच्छा असून शिक्षण पूर्ण करता येत नाही आणि आवडत्या क्षेत्रात कामही करता येत नाही. आयुष्य असंच जबाबदाऱ्या पार पाडत संपतं. पण एका कॅब ड्रायव्हरचं आयुष्य एका पॅसेंजर असं काही बदललं की, तिने याची कधी कल्पनाही केली नसेल. या महिलेने परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलं. पती वेगळा झाला. एक बाळ झालं. अशात एक दिवस एक पॅसेंजर गाडीत बसला आणि त्याने तिला शिक्षणासाठी पैसे दिले आणि तिने चांगली मेहनत घेऊन डिग्री मिळवली.
अमेरिकेच्या अटलांटामधील आहे. Latonya Young व्यवसायाने हेअर स्टायलिस्ट आहे. रात्री ती कॅब चालवते.Kevin Esch नावाच्या व्यक्तीने तिची कॅब बुक केली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. यंगने सांगितले की, ती सिंगल मदर आहे. तसेच तिने शिक्षणही सोडलं आहे. अनेकदा तिने फी भरण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. त्यामुळे तिचं शिक्षण अर्धवटच राहिलं.
यंगने त्या व्यक्तीला सांगितले की, तिची फी ७०० डॉलर म्हणजेच भारतीय करन्सीनुसार ५० हजार रूपये इतकी आहे. केविनने तिला फीस भरण्यासाठी मदत करण्याची ठरवलं. यंग सांगते की, 'आजपर्यंत कोणत्याही अनोळखी माणसाने माझी इतकी मदत केली नाही'. डिसेंबरमध्ये यंगने क्रिमिनल जस्टिसमध्ये ड्रिग्री मिळवली. इतकेच नाही तर तिने चांगले ग्रेडही मिळवले.
केविन सांगतात की, 'मी नविन कपडे घेण्याऐवजी कुणालातरी मदत करणं जास्त महत्वाचं समजतो. मला यंगवर गर्व आहे. तिने शिक्षण पूर्ण केलं. आम्ही दोघे सध्या चांगले मित्र आहोत'. यावरून हे नक्कीच बघायला मिळतं की, अजूनही जगात चांगली आणि दुसऱ्यांना मदत करणारी लोकं शिल्लक आहेत.