दोन तरूणींनी एकमेकींसोबत केलं लग्न, इंटरेस्टींग आहे त्यांची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 13:04 IST2024-01-13T13:04:07+5:302024-01-13T13:04:59+5:30
समाज आणि लग्नाचे रितीरिवाज सोडून पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दोन तरूणींनी एका मंदिरात एकमेकींसोबत संसार थाटला.

दोन तरूणींनी एकमेकींसोबत केलं लग्न, इंटरेस्टींग आहे त्यांची लव्हस्टोरी
प्रेम हे आंधळं असतं. ते कुणालाही कुणावरही होऊ शकतं. अशा अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. समाज आणि लग्नाचे रितीरिवाज सोडून पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दोन तरूणींनी एका मंदिरात एकमेकींसोबत संसार थाटला.
पश्चिम बंगालमध्ये राहणारी जयश्री राऊल (28) आणि राखी दास (23) गेल्या दोन वर्षांपासून सोबत राहत आहेत. दोन्ही तरूणी एका आर्केस्ट्रा ग्रुपमध्ये सोबत काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, दोघीही पती-पत्नीसारख्या सोबत राहत होत्या. त्यांनी हे नातं आणखी मजबूत करण्यासाठी आधी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर मंदिरात जाऊन लग्न केलं. त्यांचा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंदिरात दोघी लग्न करत असताना तिथे असलेल्या काही लोकांनी त्यांचा व्हिडीओ काढला. लग्नात एक तरूणी शेरवानी तर दुसरी तरूणी साडी नेसून होती. सलेमपुर भागातील मझौलीराजमधील प्रसिद्ध भांगड़ा भवानी मातेच्या मंदिरात हे लग्न झालं.
दरम्यान, दोन्ही तरूणी पश्चिम बंगालच्या अक्षय कॉलोनमध्ये राहणाऱ्या आहेत. चनूकी गावात एक आर्केस्ट्रा चालतो. त्यात त्या काम करतात तेव्हाच त्यांच्यात जवळीक वाढली. दोघी प्रेमात पडल्या. दोघी इतक्या जवळ आल्या की, त्यांनी पती-पत्नीसारखं राहणं सुरू केलं.