शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन रहस्यमय नद्या, ज्या वाहतात सोबत पण एक होत नाही; एकीचं पाणी काळं तर एकीचं पांढरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 10:41 IST

प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही कहाणी असते. त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये अरागवी नदीबाबतही अनेक कहाण्या सांगितल्या जातात.

दोन नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं पाणी एक होतं. पण आज आम्ही तुम्हाला दोन अशा नद्यांबाबत सांगणार आहोत ज्या वाहतात सोबत पण त्यांचं पाणी कधीच मिक्स होत नाही. एकीचं पाणी पांढरं तर दुसरीचं काळं दिसतं. जे बघून एखाद्या चमत्कारासारखं वाटतं. या नद्यांबाबत वेगवेगळ्या कथाही प्रचलित आहेत. आम्ही तुम्हाला सांगतोय जॉर्जियातील अरागवी नदीबाबत (Aragvi River Georgia).

प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही कहाणी असते. त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये अरागवी नदीबाबतही अनेक कहाण्या सांगितल्या जातात. आश्चर्याची बाब म्हणजे असं म्हणतात की, वैज्ञानिकही आतापर्यंत या नदीचं रहस्य उलगडू शकलेले नाहीत. सायंटि‍स्‍ट सांगतात की, दोन्ही पाण्यांचं घनत्व आणि तापमान वेगवेगळं आहे. ज्यामुळे एक लाइन तयार होते. जी पाण्याला एक होऊ देत नाही. 

पण एका कहाणीनुसार, नद्यांचं पाणी मिक्स न होण्यामागे 2 बहिणींची प्रेम कहाणी आहे. दोन्ही नद्या गोरी आणि श्यामला नावाच्या बहिणी आहेत. एक सोनेरी केसांची आणि दुसरी काळ्या केसांची. दोघीही एका बहादूर शूरवीराच्या प्रेमात पडल्या. नंतर त्या व्यक्तीने गोऱ्या बहिणीला निवडलं. अशात काळे केस असणाऱ्या बहिणीला वाटलं की, तिच्यामुळे आपल्या बहिणीच्या आनंदात अडचण येऊ नये. म्हणून तिने घाटात उडी घेतली. तेव्हापासून दोघी सोबत वाहत आहेत.

2 प्रेमींची कहाणी

या नद्यांबाबत आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. या भागात एक श्रीमंत व्यक्ती राहत होती. त्याच्या मुलीचं नाव तमर होतं. जी आपल्या सौंदर्यासाठी लोकप्रिय होती. ती लाशा नावाच्या एका गरीब मुलाच्या प्रेमात पडली. लाशा नदी किनारी मेंढ्याना चारा खाऊ घालण्यासाठी घेऊन जात असे. एक दिवस तमरच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ठरवलं. जेव्हा हे तिला समजलं तेव्हा तिने लाशासोबत पळून जाण्याचं ठरवलं. तेव्हात अरागवी नदीत एक मोठं वादळ आलं. तमर आणि लाशा यांची छोटी नाव नदीत उलटली. ज्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेव्हापासूनच दोघे असे वाहतात. असंही म्हटलं जातं की, गंगा नदीप्रमाणेच या नदीच्या पाण्यामुळे अनेक आजार ठीक होतात. रात्री नदीचं पाणी चमकतं. लोक यात आंघोळ करतात.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स