लग्नात अवतरली नवरदेवाची गर्लफ्रेंड अन् 'राडा' नाही; चमत्कार झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 14:52 IST2019-05-29T14:43:32+5:302019-05-29T14:52:56+5:30
प्रेमात लोकांना वेगवेगळ्या तडजोडी कराव्या लागतात. हे दर्शवणारं एक उदाहरण छत्तीसगढच्या दंतेवाडामध्ये बघायला मिळालं.

लग्नात अवतरली नवरदेवाची गर्लफ्रेंड अन् 'राडा' नाही; चमत्कार झाला!
(Image Credit : bhaskar.com)
प्रेमात लोकांना वेगवेगळ्या तडजोडी कराव्या लागतात. हे दर्शवणारं एक उदाहरण छत्तीसगढच्या दंतेवाडामध्ये बघायला मिळालं. येथील मुचनार गावात एक अनोखं लग्न झालं असून या लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. इथे बीरबल नाग नावाच्या व्यक्तीचं लग्न लागत होतं, नवरी होती प्रतिभा. अचानक इथे सुमनी नावाच्या आणखी एका तरूणीची एन्ट्री झाली. सुमनी आणि बिरबल एकमेकांवर प्रेम करतात. सामान्यपणे अशाप्रकारच्या केसेसमध्ये हाणामारी, गोंधळ, भांडणं होतात. पण हल्बा समाजाच्या लोकांनी आणि कुटुंबियांनी फारच समजुतदारीची बाजू घेऊन बिरबल, प्रतिभा आणि सुमनी या तिघांचं लग्न लावून दिलं.
लग्न मंडपात प्रेयसीची एन्ट्री
असे सांगितले जात आहे की, बिरबल आणि सुमनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण तेव्हा घरच्यांचा विरोध होता. काही दिवसांनी सुमनी तिच्या घरी परत गेली. तिने परत येण्यासही नकार दिला होता. दरम्यान दोन वर्षांनी बिरबल प्रतिभा नावाच्या तरुणीसोबत लग्न करण्यास तयार झाला. काही दिवसांनी दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि अशातच सुमनीची एन्ट्री झाली.
(Image Credit : bhaskar.com)
एक वर दोन वधू
सुमनीने अचानक एन्ट्री घेतल्यामुळे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं. पोलीस स्टेशनमध्ये दोन तरूणी आणि बिरबलच्या परिवारातील सदस्य यांच्यात चर्चा झाली. दोन्ही तरूणींनी एक पती स्विकारण्याचा निर्णय घेतला. इतकेच काय तर समाजाच्या प्रमुखांनी देखील यासाठी होकार दिला आणि तिघांचही लग्न मोठ्या धुमधडाक्यात गेल्या शनिवारी लावून देण्यात आलं.
मुलाचे वडील म्हणाले....
या लग्नाबाबत मुलाचे वडील म्हणाले की, आम्हाला याबाबत काही नाराजी नाही. मुलगा आणि त्याच्या दोन्ही पत्नी खूश आहेत. दोन्हींकडील परिवार खूश आहेत. घरात सुख-शांती रहावी यापेक्षा अजून जास्त काय हवंय.