बोंबला! एकाच मुलीच्या प्रेमात पडले दोन खास मित्र, एकीकडूनच हवीत त्यांना भरपूर लेकरं.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 14:49 IST2021-01-02T14:48:56+5:302021-01-02T14:49:21+5:30

३० वर्षीय डिनो डिसूजा आणि सॉलो गोम्स ब्राझीलचे आहेत. ते गेल्यावर्षी स्पेनच्या बार्सिलोनामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बेलारूसमधील एका बारमध्ये गेले होते.

Two best friends from brazil are in love with the same girl and planning kids with her | बोंबला! एकाच मुलीच्या प्रेमात पडले दोन खास मित्र, एकीकडूनच हवीत त्यांना भरपूर लेकरं.....

बोंबला! एकाच मुलीच्या प्रेमात पडले दोन खास मित्र, एकीकडूनच हवीत त्यांना भरपूर लेकरं.....

ब्राझीलच्या दोन मित्रांचा एकाच मुलीवर जीव आलाय म्हणजे दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले आहेत. गेल्या दीड वर्षापासून तिघेही एकमेकांना डेट करत आहेत. हे तिघेही इतर कपल्सप्रमाणेच रेस्टॉरन्ट आणि डेटवर जातात. पण तिघांनाही विचित्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. पण तिघांनी तर भविष्याबाबत खूप काही प्लॅन केलं आहे. 

३० वर्षीय डिनो डिसूजा आणि सॉलो गोम्स ब्राझीलचे आहेत. ते गेल्यावर्षी स्पेनच्या बार्सिलोनामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बेलारूसमधील एका बारमध्ये गेले होते. इथे या दोघांची भेट २७ वर्षीय ओल्गासोबत झाली होती. ती तिच्या मैत्रीणींसोबत तिथे आली होती. डिनो आणि सॉलोने तिला संपर्क साधला आणि तिघेही एकत्र डेट्सवर जाऊ लागले

डिनोने याबाबत सांगितले की सॉलो आणि मी बार्सिलोना फुटबॉल मॅच बघायला गेलो होतो. तिथे आम्हाला ओल्गा भेटली. आम्ही तिला ड्रिंक्ससाठी अॅप्रोच केलं आणि इथूनच आमची कहाणी सुरू झाली. आमच्यासाठी हा मुद्दा नाही की, आम्ही तिघे रिलेशनशिपमध्ये आहोत. आमच्यासाठी जास्त गरजेची आहे केमिस्ट्री. आमच्यात स्ट्रॉंग केमिसट्री आहे.

डिनो म्हणाला की, सुरूवातीला आम्हाला नातेवाईक, मित्रांकडून वेगवेगळ्या विचित्र रिअॅक्शन मिळत होत्या. कारण त्यांना समजून घ्यायचं होतं की, आमच्यात नेमकं काय सुरू आहे. कारण ही स्थिती सामान्यापेक्षा थोडी वेगळी होती. आम्ही फार सहज होऊन परिवार आणि मित्रांना ओल्गाबाबत सगळं काही सांगितलं आणि लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन फार बदलला आहे. लोक फार सपोर्टिव्ह झाले आहेत.

डिनो, ओल्गा आणि सॉलो गेल्या दीड वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. तिघेही सद्या फ्रान्समध्ये राहतात. आणि सोबतच त्यांना मुलंही हवी आहेत. डिनो म्हणाला की, आम्हाला जगभरात फिरायचं आहे आणि आपला बिझनेस वाढवायचा आहे. आम्हाला लाइफ फार साध्या पद्धतीने जगायचं आहे.
 

Web Title: Two best friends from brazil are in love with the same girl and planning kids with her