पावसापासून वाचवण्यासाठी रिपोर्टरने माइकवर लावला कंडोम, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:00 IST2022-09-29T12:50:03+5:302022-09-29T13:00:53+5:30
एक अमेरिकन महिला पत्रकार चर्चेत आली आहे. कारण तिने तिच्या माइकवर कंडोम लावला.

पावसापासून वाचवण्यासाठी रिपोर्टरने माइकवर लावला कंडोम, फोटो व्हायरल
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये इयान नावाच्या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे मुसळधार पाऊस, वादळ वारा आणि पूरस्थिती तयार झाली आहे. टीव्ही चॅनलपासून ते सोशल मीडियावर या वादळाचे अनेक भयावह दृश्य बघायला मिळत आहेत. कार, झाडे काय तर लोकांची घरेही यात उडून गेली. ही घटना लोकांना सांगण्यासाठी मीडियावाले सतत मेहनत करत आहेत. अशात एक अमेरिकन महिला पत्रकार चर्चेत आली आहे. कारण तिने तिच्या माइकवर कंडोम लावला.
डेली स्टार वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, NBC चॅनलची रिपोर्टर कायला गेलर (Kyla Galer) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण कायला टीव्ही माइकवर (female reporter condom on mic photo) मुलाखत घेत होती. ती फ्लोरिडातील वादळाला कव्हर करण्यासाठी तिथे आली होती आणि मोठ्या बहादुरीने घटनेचं रिपोर्टिंग करत होती. पण हैराण करणारी बाब म्हणजे तिने माइकवर कंडोम लावला. ज्यामुळे लोक हैराण झाले.
त्यानंतर कायलाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटा व्हिडीओ पोस्ट करून लोकांना सत्य सांगितलं. ती या व्हिडीओत म्हणाली की, अनेक लोक मला सोशल मीडियावर विचारत आहेत की, माझ्या माइकवर काय लावलं आहे. मला हे सांगायचं आहे की, ते जो विचार करत आहे, तो खरा आहे. मी माइकवर एक कंडोम लावला आहे. इथे खूप जास्त पाऊस येत आहे आणि माइक पावसात भिजला तर खराब होईल. मी माझं काम करू शकणार नाही. त्यामुळे मला असं करावं लागलं. तो एक कंडोम आहे.