Trending News: 27 वर्षीय तरुणाला नोकरी देण्यास अनेकांचा नकार; कारण काय? तर तो लहान मुलासारखा दिसतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 19:10 IST2022-08-02T19:09:52+5:302022-08-02T19:10:58+5:30

Trending News: जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात. अशा लोकांना अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत.

Trending News: Many refuse to give job to 27-year-old man; because he looks like a kid | Trending News: 27 वर्षीय तरुणाला नोकरी देण्यास अनेकांचा नकार; कारण काय? तर तो लहान मुलासारखा दिसतो...

Trending News: 27 वर्षीय तरुणाला नोकरी देण्यास अनेकांचा नकार; कारण काय? तर तो लहान मुलासारखा दिसतो...

Trending News: जगात असे काही लोक आहेत, जे जास्त वयाचे असूनही तरुण दिसतात. यामुळेच लोक अशा लोकांना गांभीर्याने घेत नाहीत. अशा लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असेच काहीसे एका 27 वर्षीय व्यक्तीसोबत घडले आहे. चीनमधील या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याच्याशी लोक 12 वर्षांच्या मुलाप्रमाणे वागतात. यामुळेच त्याला नोकरी मिळणेही कठीण झाले आहे. 

27 वर्षीय तरुण लहान मुलासारखा दिसतो
चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील माओ शेंग नावाच्या तरुणाला त्याच्या तरुण दिसण्यामुळे अनेक त्रास सहन करावा लागत आहे. माओ म्हणतो की, नोकरी मागायला गेल्यावर लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. अनेकांनी त्याच्यावर वय लपवल्याचा आरोपही केला. त्याला नोकरी दिली तर बालकामगार कायदा मोडल्याचा आरोप लागू शकतो, असे अनेकांना वाटते. सातत्याने नकार मिळाल्यानंतर अखेर त्याने आपली सर्व परिस्थिती टिकटॉक व्हिडिओद्वारे मांडली. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिळाली नोकरी 
सुरुवातीला अनेकांनी माओला नोकरी देण्यास नकार दिला. पण, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक रिक्रूटर्सचे त्याला कॉल आले. ऑडिटी सेंट्रलच्या मते, माओने आता नोकरी स्वीकारली आहे. तो आता घर चालवण्यासाठी पुरेशी कमाई करत आहे. 
 

Web Title: Trending News: Many refuse to give job to 27-year-old man; because he looks like a kid