कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:37 PM2024-05-15T15:37:48+5:302024-05-15T15:38:20+5:30

तुम्हाला जर कुणी सांगितलं की, लोक प्राणी नाही तर दगड पाळतात तर? तुम्हीही यावर प्रश्नात पडाल. पण हे खरं आहे. हा एक ट्रेंडच झाला आहे. 

Trend : Young people keeping stones as pets in South Korea for companionship | कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ!

कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ!

बऱ्याच लोकांना घरात मांजरी किंवा कुत्रे पाळण्याची आवड असते. लोक या पाळीव प्राण्यांचा आपल्या लेकरांसारखा सांभाळ करतात. त्यांना खूप जपतात. आजही बरेच लोक वेगवेगळे प्राणी पाळतात. पण तुम्हाला जर कुणी सांगितलं की, लोक प्राणी नाही तर दगड पाळतात तर? तुम्हीही यावर प्रश्नात पडाल. पण हे खरं आहे. हा एक ट्रेंडच झाला आहे. 

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. सगळे लोक सोबत राहत होते आणि सुखा-दु:खात एकमेकांना साथ देत होते. मुलं आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. त्यामुळे एकटेपणा, चिंता किंवा डिप्रेशनसारख्या समस्याही होत नव्हत्या. पण आजकाल लोकांना एकटेपणा जाणवत आहेत. ते मनाला आणि डोक्याला शांतता मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.

याच कारणाने काही लोक आता पाळीव प्राण्यांना सोडून दगड पाळू लागले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दक्षिण कोरियामध्ये असाच ट्रेंड सध्या सुरू आहे.

दगड पाळत आहेत लोक...

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियामध्ये लोक एकटेपणाचे इतके शिकार झाले आहेत की, मन शांत करण्यासाठी ते हे अजब काम करत आहेत. इथे तरूणांमध्ये पेट्स म्हणून दगड पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यांच्या वेगळा बेड बनवला जातो. त्यांचे वेगळे शिवले जात आहेत आणि त्यांना जिवंत प्राण्यांसारखं वागवलं जातं. इतकंच नाही तर त्यांची मसाजही केली जात आहे.

दगडांचं फेशिअल

जे कुणा असे पेट्स स्टोन ठेवत आहेत ते त्यांना मुलगा किंवा मुलगी मानतात. त्यांच्यासाठी टॉवेल, अंथरूण आणि फेशिअल किटही घेतात. हे लोक सांगतात की, दगड डिमांडिंग नसतात ना त्यांना काही खाऊ घालण्याची गरज असते ना कुठे फिरायला नेण्याची गरज असते. यांची किंमत बाजारात 600 रूपये ते 1000 रूपये असते.

Web Title: Trend : Young people keeping stones as pets in South Korea for companionship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.