वाघाचा श्रावण सुरु झाला! बनला पक्का शाकाहारी, पाहा काय खातोय ते...व्हायरल झाला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:10 IST2021-08-20T16:08:24+5:302021-08-20T16:10:07+5:30

वाघाचं नाव घेताचं समोर दिसतात ते त्याचे टोकदार दात आणि त्या दाताने तो फाडत असलेली शिकार. पण सध्या सोशल मिडियावर एक वाघाचा फोटो व्हायरल होतोय. त्यात वाघ चक्क गवत खाताना दिसतोय.

tiger eating grass photo goes viral | वाघाचा श्रावण सुरु झाला! बनला पक्का शाकाहारी, पाहा काय खातोय ते...व्हायरल झाला फोटो

वाघाचा श्रावण सुरु झाला! बनला पक्का शाकाहारी, पाहा काय खातोय ते...व्हायरल झाला फोटो

वाघाचं नाव घेताचं समोर दिसतात ते त्याचे टोकदार दात आणि त्या दाताने तो फाडत असलेली शिकार. वाघ म्हणजे मांसाहार हे समीकरण आलंच. पण सध्या सोशल मिडियावर एक वाघाचा फोटो व्हायरल होतोय. त्यात वाघ चक्क गवत खाताना दिसतोय.

ट्विटरवर आयएफएस प्रवीण कासवान यांनी हा फोटो शेअर केला आहे.  हा फोटो पोस्ट करताना कासवान यांनी त्याला “वाघ कधीही गवत खात नाही ! जेव्हा त्यांना पोटाची समस्या असते तेव्हा वगळता”असे कॅप्शन दिले आहे. वाघाचा हा फोटो पाहुन सर्वच अचंबित झाले आहेत.

या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, “मला वाटतं त्याचा आज उपवास आहे.” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “सध्या श्रावण सुरू आहे. त्यामुळे वाघ शाकाहारी झाला आहे”

प्रवीण यांनी हा फोटो पुन्हा एकदा ट्वीट करून त्याच्या खाली लिहिले आहे की सर्व बिग किंवा स्मॉल कॅट्स त्यांची पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी गवत खातात. आपण बरेचदा मांजरीलाही गवत खाताना पाहिले असेल. 

Web Title: tiger eating grass photo goes viral