ही आहे जगातली सर्वात 'कंजूस' महिला, तिचे कारनामे वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 10:04 AM2021-02-04T10:04:06+5:302021-02-04T10:13:02+5:30

एका महाकंजूसची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिने कंजूस असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे.

Thrifty woman cooks in dishwasher, owns one lightbulb and times her boyfriend's showers | ही आहे जगातली सर्वात 'कंजूस' महिला, तिचे कारनामे वाचून चक्रावून जाल...

ही आहे जगातली सर्वात 'कंजूस' महिला, तिचे कारनामे वाचून चक्रावून जाल...

Next

जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही दिलदार असतात तर काही वारेमाप खर्च करणारे असतात. तर काही लोक कंजूस टाइपचे असतात जे खिशातून पैसे काढतच नाहीत. ते पैसा जमा करण्यात विश्वास ठेवतात. पण काही लोक महाकंजूस असतात. ते स्वत: तर कंजूसपणाचं जीवन जगतातच पण सोबतच्या लोकांचंही जीवन हैराण करून सोडतात. अशाच एका महाकंजूसची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिने कंजूस असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे.

तुम्ही विचार कराल की, एक मुलगी तेही महाकंजूस? कारण मुलीतर मेकअप, पार्टी आणि खाण्यावर चांगलाच खर्च करतात. पण ज्या महिलेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिने कंजूसीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. तिने घरात असे काही नियम तयार केले आहेत की,  कुणी घरी आलं तर हैराण होईल.

या महिलेचं नाव आहे स्टेफनी बॅनेट. ती पती आणि दोन मुलांसह राहते. तिच्या तीन रूमच्या घरात केवळ एक लाइट बल्ब आहे. ज्या रूममध्ये प्रकाशाची गरज असते तिथे बल्ब लावला जातो आणि काम झालं की, काढला जातो. इतकेच नाही तर स्टेफनी डिशवॉशरमध्ये जेवण बनवते. असं करून ती ओव्हनचा खर्च वाचवते.

स्टेफनी वॉशिंग मशीनच्या फिल्टरमध्ये अडकलेला कचऱ्याचा वापर नेल पॉलिश रिमुव्हर म्हणून करते. त्याचाच मेकअप ब्रश तयार करते. स्टेफनी म्हणते की, हे पूर्णपणे स्वच्छ असतात. याने ब्रश आणि नेल पॉलिश रिमुव्हरचा खर्च वाचतो.

तसेच स्टेफनीच्या घरी टीव्ही तर लावला जातो. पण जाहिरात येताच टीव्ही बंद केला जातो. असं करून स्टेफनी वीजेचा खर्च वाचवते. स्टेफनी पतीला दोन मिनिटांपेक्षा जास्त शॉवरचा वापर करू देत नाही. बाथरूममध्ये तिने बेबी मॉनिटर बसवला आहे. हे मॉनिटर दोन मिनिटांनी शॉवर बंद करण्याचा निर्देश देतं. त्यानंतर पतीला बकेटीत पाणी घेऊन आंघोळ करावी लागते. त्यानंतर स्टेफनी मुलांच्या ताटातील शिल्लक राहिलेला सॉस आणि मेओनीज, कॅचप पुन्हा बॉटलमध्ये भरून ठेवते. 

स्टेफनी घरी पाहुण्यांना फार कमी बोलवते. सुपरमार्केटमध्ये तर लोक तिला बघून हैराण होतात. कारण ती केळंही अर्धच आणते. स्टेफनीच्या घरी पाहुणे आले तर त्यांना रूममध्ये मेणबत्ती लावून दिली जाते. स्टेफनीच्या या कंजूस स्वभावाने तिचा पतीही हैराण झाला आहे. तो म्हणाला की, स्टेफनी इतकी कंजूस आहे की, कुणीही तिच्यासोबत राहू शकत नाही. पण माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे मी सहन करतो. अनेकदा माझे कुटुंबिय येतात मला त्यांना माफी मागावी लागते. स्टेफनी एक क्लीनिकमध्ये नर्सचं आहे. तिचा पतीही नोकरी करतो. तिच्या आजूबाजूचे लोकही तिच्या कंजूसीमुळे परेशान आहेत.
 

Web Title: Thrifty woman cooks in dishwasher, owns one lightbulb and times her boyfriend's showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.