६४ वर्षीय विंस्टन ब्लॅकमोर कॅनडातील सर्वात प्रसिद्ध अनेक पत्नी असलेली व्यक्ती आहे. ब्रिटीश कोलंबियामध्ये राहणाऱ्या विंस्टन थोडी थोडकी नाही तर तब्बल १५० अपत्ये आहे आणि एकेकाळी त्यांच्या २७ बायका होत्या. त्यातील आता २२ पत्नी आहेत. विंस्टनचा १९ वर्षीय मुलगा मर्लिन ब्लॅकमोर काही दिवसांपूर्वी त्याच्या विशाल परिवाराबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे आणि त्याचे फॉलोअर्सही खूप वाढत आहेत.

टिकटॉकवर मर्लिनसोबत त्याचा २१ वर्षीय सख्खा भाऊ वॉरेन आणि १९ वर्षीय सावत्र भाऊ मरीनेही याबाबत खुलासा केलाय. या तिनही भावांनी आता ब्रिटीश कोलंबियाचं बाउंटीफुल शहर सोडलं आहे. तिघांनाही आशा आहे की, त्यांची येणारी पिढी एका परिवारासारखी असेल. 

मर्लिन आता अमेरिकेत राहतो. त्याने एका व्हिडीओत सांगितले की, त्याला सात सावत्र भाऊ-बहिणी आहेत. मर्लिन म्हणाला की, मला याबाबत बोलायचं होतं. पण मला भीती होती की, जर मी यावर बोललो तर यातून अडचणी निर्माण होऊ शकतात. मला कुणी नुकसान पोहोचवू शकलं असतं. आता मी त्या लोकांपासून दूर राहून याबाबत बोलत आहे.

एका व्हिडीओत मर्लिन म्हणाला की, त्याच्या एका सावत्र बहिणीचा आणि सावत्र भावाचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. तेच मर्लिनने सांगितले की, त्याच्यात आणि त्याच्या भाऊ-बहिणींमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. मर्लिनचा सर्वात मोठा भाऊ ४४ वर्षांचा आहे तर त्याचा सर्वात लहान भाऊ १ वर्षांचा आहे. मर्लिनने हेही सांगितले की, इथे बर्थडे पार्ट्याही फार सामान्य होतात. मर्लिन एका व्हिडीओत म्हणाला की, असं होत नव्हतं की, एखाद्याच्याा बर्थडे पार्टीत १५० लोक आले. साधारणपणे बर्थडेला जवळचे मित्र आणि सख्खे भाऊ-बहीण हेच येतात.

मर्लिनसोबत वॉरेनही टिकटॉकवर परिवारासंबंधी गोष्टी शेअर करतो. एका व्हिडीओत वॉरेनने सांगितले की, त्याच्या क्लासमध्ये १९ विद्यार्थी होते. ते सगळेच १९९९ मध्ये जन्मलेले होते. वॉरेनने सांगितले की, त्याला पाच भाऊ चार बहिणी, सात चुलत भाऊ आणि दोन भाचे होते. म्हणजे संपूर्ण क्लासमध्ये त्याचे भाऊ, बहीण आणि नातेवाईक होते. हे स्कूलही त्याच्या वडिलांचं होतं. वॉरेन म्हणाला की, जास्तकरून ते खायला लागणारा भाजीपाला, धान्य स्वत:च उगवत होते.

तर मरीने हे सांगितले की, तो त्याच्या फायनल इअर एज्युकेशनसाठी एका पब्लिक स्कूलमध्ये गेला होता. तिथे त्याला त्याच्या परिवाराच्या इतिहासाबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली. मरीने सांगितले की, लॉ च्या पुस्तकात एक पूर्ण सेक्शन त्याच्या परिवारावर होतं. तो म्हणाला की, त्याचा परिवार २००२ पर्यंत एफएलडीएस चर्चचा भाग होता. त्यानंतर वॉरेन जेफ नावाच्या एका व्यक्तीने या चर्चचं एक प्रोफेट बनवलं होतं आणि त्यानंतर परिवार चर्चापासून वेगळा झाला होता. तो म्हणाला की, त्याला नव्हतं माहीत की, त्याचा परिवार इतका चर्चेत आहे.
 

Web Title: Three sons sharing thoughts on social media how it is to be lived as a family under a polygamist father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.