कॅन्सरने जीव गेलेल्या मुलाची होती शेवटची इच्छा, हजारों स्पोर्ट्स कार्ससोबत निघाली अंत्ययात्रा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 15:23 IST2019-11-21T15:18:06+5:302019-11-21T15:23:56+5:30
कॅन्सर एक असा आजार आहे ज्यात जवळपास प्रत्येकाला आपला जीव गमवावा लागतो. पण जर या आजाराच्या पहिल्या स्टेजमध्येच याची माहिती मिळाली तर जीव वाचू शकतो.

कॅन्सरने जीव गेलेल्या मुलाची होती शेवटची इच्छा, हजारों स्पोर्ट्स कार्ससोबत निघाली अंत्ययात्रा...
कॅन्सर एक असा आजार आहे ज्यात जवळपास प्रत्येकाला आपला जीव गमवावा लागतो. पण जर या आजाराच्या पहिल्या स्टेजमध्येच याची माहिती मिळाली तर जीव वाचू शकतो. या जीवघेण्या आजाराच्या जाळ्यात अडकल्यानंतर सर्वच स्वप्ने आणि आवडी-निवडी नष्ट होतात. असंच काहीसं वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या एलेक एनग्रामकीसोबत झालं. कार्सची आवड असणाऱ्या या १४ वर्षाच्या मुलाचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्याची शेवटची इच्छा होती की, त्याची अंत्ययात्रा स्पोर्ट्स कार्ससोबत काढली जावी. तो त्याचा हा विचार सोशल मीडियातही नेहमी शेअर करता होता.
एलेकची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाटी 'सिडनीज सोल्जर्स ऑलवेज' नावाच्या एका ग्रुपने बरीच मदत केली. या ग्रुपच्या मदतीने एलेकच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी २१०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स कार्स आणि ७० पेक्षा अधिक मोटारसायकलच्या मालकांचा ताफा एकत्र आला होता.
(Image Credit : abcnews.go.com)
अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातून या अंत्ययात्रेसाठी लोक आले होते. कॅलिफोर्निया, मिशिगन, इंडियाना, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडाहून स्पोर्ट्स कार्सचे जास्तीत जास्त मालक त्यांची कार स्वत: चालवत घेऊन आले होते. तर काहींनी ड्रायव्हरला पाठवले होते. या अंत्ययात्रेला मार्ग देण्यासाठी वॉशिंग्टनमधील मिसौरी शहर दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे या अंत्ययात्रेत सहभागी झालेले जास्तीत जास्त कार्स मालक हे एलेकला ओळखतही नव्हते.
(Image Credit : y98.radio.com)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'स्पोर्ट्स कार्स फॉर एलेक' चं आयोजन करण्यात आलं होतं. सिडनीज सोल्जर्स ऑलवेजचे मुख्य दाना ख्रिश्चियन मॅनलीने या सर्व गाड्यांची व्यवस्था केली होती. मॅनली सुद्धा कॅन्सरने ग्रस्त आहे. त्याची ८ वर्षांची मुलगी सिडनीचा कॅन्सरमुळेच जीव गेला होता.
मॅनली सांगतो की, आमच्या संपर्कात जेवढे कॅन्सरने पीडित स्थानिक आहेत, ते सगळे एका परिवारातील सदस्यांसारखे राहतात. ते एकमेकांची मदत करतात. आमच्या संघटनेकडे वेगवेगळ्या आजाराने पीडित मुलांची यादी आहे. त्यामुळे मी एलेकच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या आईला विचारलं होतं की, एलेकची इच्छा काय आहे? त्यानंतर आम्ही केलेल्या आवाहनानंतर देशभरातून लोक इथे आले.