penguins: ज्यांना आपण समजतो पेंग्विन ते आहेत एलियन?, मिळाले अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 09:27 PM2021-09-19T21:27:25+5:302021-09-19T21:28:52+5:30

Jara hatke News : पेंग्विनबाबत एक विचित्र दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाळ परिसरात दिसून येणारे काळे-पांढरे पेंग्विन हे एलियन्स असू शकतात.

Those penguins we understand are aliens ?, got evidence of connection to another planet | penguins: ज्यांना आपण समजतो पेंग्विन ते आहेत एलियन?, मिळाले अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे

penguins: ज्यांना आपण समजतो पेंग्विन ते आहेत एलियन?, मिळाले अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे

googlenewsNext

लंडन - ध्रुवीय प्रदेशात वास्तव्य असलेला पेंग्विन हा या जगातील सर्वात विचित्र प्राण्यांपैकी एक आहे. हा एक असा पक्षी आहे जो लांब उड्डाण करू शकत नाही. (Jara hatke ) तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हा पक्षी चालणे पसंत करतो. आता या पेंग्विनबाबत एक विचित्र दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाळ परिसरात दिसून येणारे काळे-पांढरे पेंग्विन हे एलियन्स असू शकतात. (Those penguins we understand are aliens ?, got evidence of connection to another planet)

तज्ज्ञांना पेंग्विनच्या विष्ठेमध्ये एक खास प्रकारचे रसायन मिळाले आहे. ते शुक्र ग्रहावरसुद्धा सापडते. ब्रिटनमधील संशोधकानी पेंग्विनच्या विष्ठेमध्ये phosphine नावाचे रसायन शोधले आहे. या शोधामुळे पेंग्विनच्या उत्पत्तीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता शुक्र ग्रहापासून ३८ दशलक्ष मैल दूर असलेल्या पृथ्वीवर फॉस्फिन कसे काय अस्तित्वात असू शकते, याचा शोध तज्ज्ञांकडून घेतला जात आहे.

संशोधनानंतर आता तज्ज्ञांना अपेक्षा आहे की, पेंग्विन दुसऱ्या जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या जिवांची म्हणजेच एलियन्सची ओळख पटवण्यामध्ये त्यांची ओळख पटवू शकतो. या रसायनाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ आता Gentoo Penguins च्या जीवनशैलीची ओळख पटवण्यासाठी अधिक संशोधनाची योजना आखत आहेत. हे पेंग्विन फॉकलँड बेटावर मोठ्या प्रमाणात आहेत. रिपोर्ट्सनुसार जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या लाँचपूर्वी पेंग्विन आणि फॉस्फिनबाबत शोध घेतला जात आहे.

डेलिस्टारशी बोलताना लंडनमधील इंपिरियल कॉलेजचे डॉ. डेव्ह क्लेमेंट्स यांनी सांगितले की, फॉस्फिनचा शोध हा खरा आहे. मात्र हे कसे तयार होते हे आम्हाला माहिती नाही. Anaerobic Bacteria फॉस्फिन तयार करतात. ते तलावातील चिखल आणि पेंग्विनच्या विष्ठेमध्ये सापडतात. २०२ मध्ये शुक्र ग्रहाच्या आसपास गॅसच्या आवरणांमध्ये या रसायमाच्या खाणाखुणा सापडल्या होत्या. तेथील वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे.  

Web Title: Those penguins we understand are aliens ?, got evidence of connection to another planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.