'या' देशात शिक्षण आणि उपचार मोफत, लग्न केल्यावर सरकार स्वत: देतं लाखो रूपये गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:55 IST2026-04-05T13:54:45+5:302026-04-05T13:55:12+5:30

Interesting Facts : इथे जन्म घेणं म्हणजे जणू लॉटरी लागल्यासारखं मानलं जातं, कारण सरकार नागरिकांची जबाबदारी जन्मापासून ते लग्नापर्यंत उचलते.

This gives free education healthcare marriage money to its citizens | 'या' देशात शिक्षण आणि उपचार मोफत, लग्न केल्यावर सरकार स्वत: देतं लाखो रूपये गिफ्ट

'या' देशात शिक्षण आणि उपचार मोफत, लग्न केल्यावर सरकार स्वत: देतं लाखो रूपये गिफ्ट

Interesting Facts : आजच्या काळात जिथे एक सामान्य माणूस आयुष्यभर घर, शिक्षण आणि लग्नाच्या खर्चात अडकलेला असतो, तिथे संयुक्त अरब अमीरात हा देश आपल्या नागरिकांसाठी जणू “अलादीनचा चिराग” ठरतो. इथे जन्म घेणं म्हणजे जणू लॉटरी लागल्यासारखं मानलं जातं, कारण सरकार नागरिकांची जबाबदारी जन्मापासून ते लग्नापर्यंत उचलते.

शिक्षण पूर्णपणे मोफत

यूएईमध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. इथं नागरिकांसाठी किंडरगार्टनपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत शिक्षण मोफत असतं. जायद युनिव्हर्सिटी आणि यूएई युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित संस्थांमध्येही विद्यार्थ्यांना फी भरावी लागत नाही.

इतकंच नाही, जर एखादा विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचा असेल, तर सरकार त्याला पूर्ण स्कॉलरशिप देते. यात शिक्षणाचा खर्च, राहण्याचा खर्च, प्रवास आणि इतर सुविधा सुद्धा समाविष्ट असतात. यामागचा उद्देश म्हणजे देशासाठी सुशिक्षित नागरिक तयार करणे.

लग्नासाठी सरकारकडून मदत

लग्नाचा खर्च मोठा असल्यामुळे यूएई सरकारने शेख जायद मॅरेज फंड सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच लग्न करणाऱ्या एमिराती तरुणांना सुमारे 70,000 दिरहम (अंदाजे 16 लाख रुपये) इतकी आर्थिक मदत दिली जाते.

2026 सालीही या योजनेसाठी मोठा बजेट ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे हजारो तरुणांना याचा फायदा होतो. या पैशामुळे नवविवाहित जोडप्यांना कर्ज न घेता नवीन आयुष्य सुरू करता येतं.

Web Title : यूएई: मुफ्त शिक्षा, स्वास्थ्य सेवा, सरकार शादी पर देती है उपहार

Web Summary : यूएई अपने नागरिकों को किंडरगार्टन से विश्वविद्यालय तक मुफ्त शिक्षा प्रदान करता है, जिसमें विदेश में पढ़ाई के लिए छात्रवृत्ति भी शामिल है। सरकार पहली शादी के लिए अमीराती युवाओं को लगभग ₹16 लाख की वित्तीय सहायता भी प्रदान करती है, जिससे उन्हें बिना कर्ज के अपना जीवन शुरू करने में मदद मिलती है।

Web Title : UAE: Free Education, Healthcare, and Marriage Gifts from Government

Web Summary : The UAE provides citizens free education from kindergarten to university, including scholarships for overseas studies. The government also offers financial assistance of approximately ₹16 lakhs to Emirati youth for their first marriage, aiding them in starting their lives without debt.