दरवर्षी 'या' ठिकाणी पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या यामागचं रहस्य आणि वैज्ञानिकांचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:34 IST2026-03-11T17:16:31+5:302026-03-11T17:34:20+5:30

Fish Rain Facts : आपण कधी आकाशातून मासे खाली पडतात असं काही ऐकलं नसेल. या गोष्टीवर सहजपणे विश्वास ठेवणं तसं अवघड आहे. पण हे सत्य आहे.

This country has seen fish falling from the sky for over 100 years | दरवर्षी 'या' ठिकाणी पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या यामागचं रहस्य आणि वैज्ञानिकांचं मत...

दरवर्षी 'या' ठिकाणी पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या यामागचं रहस्य आणि वैज्ञानिकांचं मत...

Fish Rain Facts : जगभरात अशा अनेक घटना सतत घडत असतात, ज्या एखाद्या काल्पनिक कथेसारख्या वाटतात. सामान्यपणे आपण आकाशातून पाऊस, बर्फ किंवा गारा पडताना बघतो. पण आपण कधी आकाशातून मासे खाली पडतात असं काही ऐकलं नसेल. या गोष्टीवर सहजपणे विश्वास ठेवणं तसं अवघड आहे. पण हे सत्य आहे. मध्य अमेरिकेतील छोटासा देश होंडुरासमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून माशांचा पाऊस पडल्याची अनोखी घटना समोर येत असते. हे अनोखं रहस्य जगभरातील लोकांसाठी आणि वैज्ञानिकांसाठी सुद्धा आश्चर्याचा विषय बनलं आहे. 

काय आहे या घटनेचं रहस्य?

ही घटना मध्य अमेरिकेतील देश होंडुरासमध्ये बघायला मिळतं. हा देश मेक्सिकोच्या जवळ आहे. येथील काही भागांमध्ये दरवर्षी एकदा किंवा दोनदा माशांचा पाऊस पडल्याचं सांगितलं जातं. स्थानिक लोक सांगतात की, ही घटना सामान्यपणे वसंत ऋतूच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीला घडते. त्यावेळी अचानक येणारे वादळ आणि पावसानंतर जमिनीवर छोटे छोटे मासे दिसायला लागतात. लोक हे मासे गोळा करून घरी नेतात आणि खातात.

वैज्ञानिक याबाबत काय सांगतात?

वैज्ञानिकांनुसार, या घटनेमागे वातावरण आणि समुद्राशी संबंधित नॅचरल कारणं असू शकतात. होंडुरासचं अंतर अटलांटिक महासागरापासून साधारण २०० किलोमीटर इतकं आहे. असं मानलं जातं की, कधी कधी मोठी वादळ किंवा चक्री वादळ समुद्रातील छोटे छोटे मासे खेचून नेतं आणि नंतर वादळ शांत झालं की, मासे जमिनीवर पडतात. हेच कारण आहे की, पावसानंतर जमिनीवर मासे पडलेले दिसतात. पण या सिद्धांताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण काही ठिकाणांवर मासे गोड्या पाण्यातील असतात. याच कारणाने आजही ही घटना रहस्य बनून आहे.

वैज्ञानिक ही घटना नॅचरल असल्याचं सांगतात, तर स्थानिक लोकांचं यावर वेगळंच मत आहे. येथील लोक या घटनेला देवाचा चमत्कार मानतात. त्यांच्या मान्यतेनुसार, १९व्या शतकात इथे एका स्पॅनिश धर्मगुरूने गरीब लोकांसाठी तीन दिवस आणि तीन रात्री प्रार्थना केली होती. त्यांनी देवाकडे लोकांसाठी जेवणाची सोय करण्याची मागणी केली होती. असं सांगितलं जातं की, त्यानंतर अचानक अंधार झाला आणि जोरदार पावसासोबत मासे पडू लागले होते. तेव्हापासूनच ही अनोखी घटना घडते. लोकांसाठी ही घटना आस्थेचा विषय आहे.

Web Title : होंडुरास में मछली की बारिश का रहस्य: विज्ञान और स्थानीय मान्यताएँ

Web Summary : होंडुरास में एक अजीब घटना होती है: मछली की बारिश। वैज्ञानिक इसे तूफानों द्वारा समुद्र से मछली उठाने के लिए जिम्मेदार ठहराते हैं, जबकि स्थानीय लोगों का मानना है कि यह 19वीं सदी की प्रार्थना से मिला दिव्य आशीर्वाद है। यह घटना, जो सालाना होती है, आंशिक रूप से अस्पष्ट है क्योंकि मीठे पानी की मछली अंतर्देशीय दिखाई देती है।

Web Title : Mystery of Fish Rain in Honduras: Science and Local Beliefs

Web Summary : Honduras experiences a peculiar phenomenon: fish rain. Scientists attribute it to storms lifting fish from the ocean, while locals believe it's a divine blessing from a 19th-century prayer. The event, occurring annually, remains partly unexplained due to freshwater fish appearing inland.