ही दोस्ती तुटायची नाय....एकाला आहे कॅन्सर, दुसरा त्याला 'अशी' देतो साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:30 IST2019-09-10T12:30:13+5:302019-09-10T12:30:49+5:30
मैत्रीची वेगवेगळी लक्षात राहतील अशी उदाहरणे आपण पाहिली आहेत. असंच एक मैत्रीचं वेगळं उदाहरण समोर आलं आहे.

ही दोस्ती तुटायची नाय....एकाला आहे कॅन्सर, दुसरा त्याला 'अशी' देतो साथ!
मैत्रीची वेगवेगळी लक्षात राहतील अशी उदाहरणे आपण पाहिली आहेत. असंच एक मैत्रीचं वेगळं उदाहरण समोर आलं आहे. पण ही दोन माणसांची मैत्री नाही तर दोन कुत्र्यांच्या मैत्रीचं आहे. हा फोटो आहे वॉटसन आणि किकोचा. दोघे मित्र आहेत. किकोला(भुरक्या रंगाचा) कॅन्सर होता. त्यामुळे त्याचा पाय कापावा लागला. पण वॉटसनने त्याची साथ सोडली नाही.
इन्स्टाग्रामवर एक दोघांचं एक पेज तयार करण्यात आलं आहे. ज्यावर दोघांचे फोटो शेअर केले जातात.
त्यांच्या या इन्स्टाग्राम पेजवर त्यांचे ८५ हजार फॉलोअर्स आहेत.
किको सध्या कॅन्सरसोबत लढत आहे.
कुत्रेही मनुष्यांसारखी असतात. त्यांनाही वाईट परिस्थितीमध्ये कुणाची तरी साथ हवी असते. एकतर त्यांच्या मालकाची नाही तर मित्राची.