पत्नीला दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडलं, घटस्फोट घेण्यासाठी गेला तर कोर्टाने त्यालाच तुरूंगात डांबलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:28 IST2024-08-24T13:28:29+5:302024-08-24T13:28:50+5:30

फॅन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीच्या अफेअरचा भांडाफोड करण्यासाठी तुरूंगात जावं लागलं आहे.

The wife was caught red-handed with someone else, if he went to get a divorce, the court put him in jail! | पत्नीला दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडलं, घटस्फोट घेण्यासाठी गेला तर कोर्टाने त्यालाच तुरूंगात डांबलं!

पत्नीला दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडलं, घटस्फोट घेण्यासाठी गेला तर कोर्टाने त्यालाच तुरूंगात डांबलं!

नातं मग गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं असो वा पती-पत्नीचं दगा मिळाल्यावर व्यक्ती मनातून तुटून जाते. इतकंच नाही जर दगाही तुमच्यासोबत झाला असेल आणि शिक्षाही तुम्हालाच मिळाली असेल तर मग याहून अजून काय वाईट असू शकतं. अशीच एक घटना नुकतीच चीनमधून समोर आली आहे. इथे फॅन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीच्या अफेअरचा भांडाफोड करण्यासाठी तुरूंगात जावं लागलं आहे.

अनेक वर्षापासून विवाहित या कपलला दोन मुलं आहेत. पण काही दिवसांआधी फॅनला पत्नीचं एखाद्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय आला. आपला संशय दूर करण्यासाठी त्याने लिव्हिंग रूमसोबतच बेडरूमध्येही हिडन कॅमेरे लावले. एका आठवड्यात त्याच्यासमोर सत्य आलं. तो घरी नसताना पत्नीला भेटायला एक पुरूष येत असल्याचं त्याला समजलं. 

फॅनने पत्नीकडून घटस्फोट घेण्यासाठी हे फुटेज कोर्टात पुरावा म्हणून सादर केलं. पण त्याला याचा जराही अंदाज नव्हता की, हे त्यालाच महागात पडणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये फॅनने पत्नी आणि तिच्या वकीलाला घटस्फोटाची चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. पण त्यांच्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे फॅनने पत्नीविरोधात सिव्हिल डॅमेजसाठी एक केस दाखल केली. पण त्याला हे माहीत नव्हतं की, त्याची पत्नीने त्याच्यापेक्षा जास्त तयारी करून ठेवली आहे.

महिला एका स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पतीवर सहमतीशिवाय घरात कॅमेरे लावण्याचा आणि प्रायव्हसी भंग केल्याचा आरोप केला.

फॅनच्या पत्नीने त्याच्या विरोधात केस दाखल केली. झालं असं की, कोर्टाने फॅनला कोणत्याही कारणाशिवाय गुप्त रूपाने घरात कॅमेरे लावण्यासाठी 3 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

फॅनने या निर्णयाविरोधात अपील केली. पण कोर्टाने त्याची अपील फेटाळून लावली. आता फॅनला त्याच्याच घरात त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडल्याने तुरूंगात रहावं लागणार आहे. सध्या या घटनेवरून चीनच्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Web Title: The wife was caught red-handed with someone else, if he went to get a divorce, the court put him in jail!