दारूच्या ग्लासला 'पेग' का म्हटलं जातं? जाणून घ्या काय होतो याचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 03:13 PM2024-06-22T15:13:18+5:302024-06-22T15:19:16+5:30

Meaning Of Peg :दारूचं प्रमाण मोजण्याची एक पद्धत म्हणजे पेग असं समजलं जातं. पण पेगला पेग का म्हणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

The story behind why drinks are measured in Pegs? | दारूच्या ग्लासला 'पेग' का म्हटलं जातं? जाणून घ्या काय होतो याचा अर्थ

दारूच्या ग्लासला 'पेग' का म्हटलं जातं? जाणून घ्या काय होतो याचा अर्थ

Meaning Of Peg : लोकांचं दारू पिण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. अशात दारू पिणाऱ्यांसाठी पेग हा शब्द काही नवीन नाही. तस पाहिलं तर सहजपणे मित्रांमध्ये असं बोललं जातं की, चल पेग मारून येऊ. पण पेग हा शब्द आला कुठून आणि याचा अर्थ काय होतो हे अनेकांना माहीत नसतं. दारूचं प्रमाण मोजण्याची एक पद्धत म्हणजे पेग असं समजलं जातं. पण पेगला पेग का म्हणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे पेगचा अर्थ?

पेग हा शब्द परदेशात आपल्याकडे आला आहे. हा शब्द मूळ लंडनमधून आला. लंडनचं वातावरण फारच थंड असतं. त्या काळात खाण कामगारांना काम संपले की खाण मालक एक ग्लास दारू देत असे. कामाचा स्ट्रेस निघून जाण्यसाठी हा दारूचा ग्लास त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असे. हेच कामगार त्या दारुच्या ग्लासाला PRECIOUS EVENING GLASS असे म्हणत असे. याच शब्दाचे संक्षिप्त रूप P.E.G. (PRECIOUS EVENING GLASS) हे आहे. त्यानंतर हा शब्द सर्वत्र पोहोचला आणि दारूच्या ग्लासला पेग म्हणून संबोधल्या जाऊ लागले.

पटियाला पेगचा जन्म

'पटियाला पेग' या शब्द पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंह यांची देण आहे. त्यांनी १९२० मध्ये हा शब्द वापरला. ब्रिटीशांसोबत झालेल्या एका क्रिकेट सामन्यात महाराजांनी ब्रिटीशांना मात दिली होती. त्या सामन्यादरम्यान 'पटियाला पेग' जन्म झाला.

या सामन्यातील दमदार खेळानंतर स्वत: महाजाराजांनी ग्लासात व्हिस्की भरली. ग्लासांमध्ये व्हिस्कीचं प्रमाण दुप्पट होतं. यावेळी चिअर्स करण्यासाठी कर्नल डग्लसला महाराजांनी ग्लास दिला तर या पेगबाबत त्याने महाराजांना विचारले. तेव्हा महाराज हसत म्हणाले की, 'तुम्ही पटियालात माझे पाहुणे आहात, टोस्टसोबत 'पटियाला पेग' पेक्षा कमी काहीच नाही मिळणार'. तेव्हापासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांना पटिलाय पेग देण्याची प्रथा पडली.

Web Title: The story behind why drinks are measured in Pegs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.