दुकानदारानं पत्नीला डिस्काऊंट दिला नाही, पतीनं रागानं दुकानच लुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:29 IST2022-12-24T13:28:22+5:302022-12-24T13:29:18+5:30

वाचा नक्की काय घडलं?

The shopkeeper did not give the wife a discount the husband robbed the shop in anger | दुकानदारानं पत्नीला डिस्काऊंट दिला नाही, पतीनं रागानं दुकानच लुटलं

दुकानदारानं पत्नीला डिस्काऊंट दिला नाही, पतीनं रागानं दुकानच लुटलं

Husband Looted Shop For Wife: आपण शॉपिंग करायला जातो तेव्हा अनेकदा दुकानदाराकडे त्यावर काही ना काही डिस्काऊंट मागतो. काही वेळा यातून वादही निर्माण होतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला शॉपिंग करण्यासाठी गेली होती आणि तिनं दुकानदाराकडे डिस्काऊंट मागितलं. परंतु त्यानं ते देण्यास नकार दिला. यानंतर महिला तिकडून निघून गेली. परंतु त्यानंतर जे काही झालं ते धक्कादायक होतं.

वास्तविक ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे राहणारी महिला काही स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली होती. यानंतर तिने पैसे दिले तेव्हा तिला डिस्काऊंट मिळाला नाही. परंतु सवलत आपला हक्क असल्याचा युक्तिवाद महिलेने केला. यावरून तिचा दुकानदाराशी वाद झाला. त्यानंतर घरी परतल्यावर तिनं संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला.

सुरुवातीला तिच्या पतीने तिच्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर त्याला राग आला आणि हे दुकान लुटण्याचा कट रचला. संध्याकाळी तिचा पती त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं दुकानातील सामान लुटलं. मात्र, दुकानातील कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग करून नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीवर लुटपाट केल्याचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: The shopkeeper did not give the wife a discount the husband robbed the shop in anger