जगातील एकुलतं एक असं फळ जे विमान आणि रेल्वेतून सोबत नेण्यावर बंदी, पाहा कोणतं फळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:33 IST2026-01-21T15:32:33+5:302026-01-21T15:33:51+5:30
Interesting Facts: आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण विमान आणि रेल्वेतून प्रवास करताना आपण एक फळ सोबत नेऊ शकत नाही. ते फळ कोणतं हे जाणून घेऊया.

जगातील एकुलतं एक असं फळ जे विमान आणि रेल्वेतून सोबत नेण्यावर बंदी, पाहा कोणतं फळ
Interesting Facts: आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी अनेकांची इच्छा असते, तर रेल्वेने लोक नेहमीच प्रवास करतात. विमान असो की रेल्वे दोन्हींमध्ये प्रवास करत असताना काही नियम पाळावे लागतात. काही नियम तर सर्वसामान्य लोकांना माहीत असतात, पण काही असे नियम असतात, जे कुणालाच माहिती नसतात. विमान आणि रेल्वेतून प्रवास करताना एका खास गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण विमान आणि रेल्वेतून प्रवास करताना आपण एक फळ सोबत नेऊ शकत नाही. ते फळ कोणतं हे जाणून घेऊया.
तशा तर रेल्वे आणि विमानात अनेक गोष्टी सोबत नेण्यावर बंदी असते. जसे की, मृत कोंबड्या, फटाके, विस्फोटक, अॅसिड, सिगारेट, पेट्रोल, डिझेल इत्यादी. आणखी काय काय बॅन असतं, हे खालीलप्रमाणे बघता येईल.
गॅस सिलेंडर (रिकामं असेल तरीही)
फटाके
सिगारेट
अॅसिड
तेल
ग्रीस
ज्वलनशील रसायनं
दारू पिऊन प्रवास करणं आणि दारू सोबत नेण्यावरही बंदी
सडलेले आणि दुर्गंधी येणारे पदार्थ
रेल्वे आणि विमानात कोणतं फळ बॅन?
सहजपणे कुणाच्याही मनात प्रश्न येऊ शकतो की, विमान किंवा रेल्वेने प्रवास करताना आपण वेगवेगळी फळं खात असतो. मग असं कोणतं फळ आहे जे नेण्यास बंदी आहे? तर ते फळ म्हणजे वाळलेलं नारळ. वाळलेलं नारळ सोबत नेण्यास विमान आणि रेल्वे दोन्हीमध्ये बंदी आहे. कारण वाळलेलं नारळ गहे ज्वलनशील मानलं जातं. कारण याचं बाहेरील आवरण लगेच पेट घेऊ शकतं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे फळ विमानातून आणि रेल्वेतून सोबत नेण्यावर बंदी असते. जर आपण नारळ सोबत घेऊ प्रवास केला तर आपल्याला १ हजार रूपये दंड भरावा लागू शकतो किंवा ३ वर्षे तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
असं असलं तरी पूजेसाठी एक किंवा दोन नारळ सोबत नेण्यास मुभा आहे. पण जास्त प्रमाणात म्हणजे ठोकमध्ये वाळलेले नारळ रेल्वे आणि विमानातून नेण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तसेच आपण पाणी असलेलं नारळ म्हणजेच शहाळं किंवा वाळलेल्या शेंड्या नसलेलं नारळ नेऊ शकता. अशात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.