३२ वर्षांपासून समुद्रात तरंगत होती बाटली, आत सापडले एक पत्र, मेसेज वाचून लोक झाले भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:20 PM2024-02-05T15:20:03+5:302024-02-05T15:22:45+5:30

हे पत्र नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी लिहिल्याचे समोर आले

The bottle was floating in the sea for 32 years, a letter was found inside, people got emotional after reading the message | ३२ वर्षांपासून समुद्रात तरंगत होती बाटली, आत सापडले एक पत्र, मेसेज वाचून लोक झाले भावनिक

३२ वर्षांपासून समुद्रात तरंगत होती बाटली, आत सापडले एक पत्र, मेसेज वाचून लोक झाले भावनिक

Letter in Bottle : अनेक वेळा काही दशके जुनी वस्तू समुद्राच्या किनाऱ्यावर आढळते, हे आश्चर्यकारक आहे. नुकतेच न्यूयॉर्कच्या शिनेकॉक बे येथे असेच काहीसे आढळून आले. ही काचेची बाटली होती. आता तुम्ही विचार कराल की त्यात काय खास आहे, तर ती कोणतीही सामान्य बाटली नव्हती तर ती गेल्या ३२ वर्षांपासून समुद्रात तरंगत होती आणि त्यात एक पत्रही होते. पत्र लिहिल्यानंतर कोणीतरी ते एका बाटलीत बंद करून अटलांटिक महासागरात फेकले. हे पत्र १९९२ मध्ये न्यूयॉर्कमधील मॅटिटक हायस्कूलच्या नववीत शिकणाऱ्या शॉन आणि बेनी नावाच्या विद्यार्थ्यांनी लिहिले होते. पृथ्वी विज्ञान प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांनी ही बाटली लाँग आयलंडजवळील अटलांटिक महासागरात फेकली होती. पत्रात विद्यार्थ्यांनी 'दिलेली माहिती भरा आणि बाटली दिलेल्या पत्त्यावर परत करा', असे लिहिले होते. त्यात त्यांनी शाळेचा पत्ता लिहिला होता.

nypost नुसार, ॲडम ट्रॅव्हिस नावाच्या व्यक्तीला शिनेकॉक खाडीमध्ये हे बाटलीबंद पत्र सापडले. यानंतर, त्याने मॅटिटक हायस्कूल माजी विद्यार्थी नावाच्या फेसबुक पेजवर बाटली आणि पत्राची छायाचित्रे शेअर केली. पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या बेनी डोरोस्कीने पोस्ट पाहिल्यावर तो भावूक झाला. भूविज्ञान शिक्षक रिचर्ड ई. ब्रूक्स यांची पोस्टमध्ये आठवण झाली आहे. बेनीने लिहिले की, मिस्टर ब्रूक्स हे एक अद्भुत शिक्षक होते. हे ३२ वर्षांपूर्वीचे आहे यावर विश्वास बसत नाही. मला बाटली सापडलेल्या व्यक्तीला भेटायचे आहे. ॲडमने त्याच्या कमेंटला उत्तर दिल्यावर त्याची इच्छा देखील पूर्ण झाली. त्याने बेनीला सांगितले की तो बदकांच्या शिकारीची उपकरणे साफ करत असताना त्याला ढिगाऱ्यात बाटलीबंद पत्र दिसले.

त्याचवेळी शिक्षक ब्रूक्सचा मुलगा जॉन ही पोस्ट पाहून खूप भावूक झाला. तो म्हणाला, मी खूप भावूक आहे. विद्यार्थ्यांसोबत असे उपक्रम करणे वडीलांना खूप आवडायचे. हा माझ्यासाठी चांगला क्षण आहे. यानंतर जॉनने ॲडमचे आभार मानले आणि सांगितले की त्याचे वडील आता या जगात नाहीत. गेल्या वर्षी अल्झायमरने त्यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समुद्रात बाटलीबंद पत्र तरंगताना सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९९७ मध्येही अशा बातम्या समोर आल्या होत्या. जेव्हा मॅसॅच्युसेट्समधील पाचव्या वर्गातील विद्यार्थ्याने लिहिलेला बाटलीबंद संदेश फ्रान्समधील वेंडी येथे सापडला. याशिवाय १९७२ मध्ये लिहिलेले पत्र २०१९ मध्ये सापडले होते.

Web Title: The bottle was floating in the sea for 32 years, a letter was found inside, people got emotional after reading the message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.