असा कुठला रुम आहे ज्याला कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो, असं आहे UPSCच्या मुलाखतीतील प्रश्नाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:46 IST2022-05-10T18:36:42+5:302022-05-10T18:46:59+5:30
UPSC Interview Questions: यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या मार्गातील सर्वात कठीण आणि अखेरचा अडथळा हा मुलाखत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं.

असा कुठला रुम आहे ज्याला कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो, असं आहे UPSCच्या मुलाखतीतील प्रश्नाचं उत्तर
मुंबई - यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या मार्गातील सर्वात कठीण आणि अखेरचा अडथळा हा मुलाखत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाते. या मुलाखतीमधील अनेक प्रश्न हे बुद्धिमत्तेची कसोटी घेणारे आणि क्लिष्ट असतात. आज आपण जाऊन घेऊयात, या मुलाखतींमध्ये विचारण्यात येणाऱ्या अशाच काही प्रश्नांविषयी.
१ - अशी कुठली खोली आहे ज्यामध्ये कुठलीही खिडकी किंवा दरवाजा नसतो?
- मशरूम
२ - जर कुणाच्या तरी हातामध्ये चार-चार संत्री आणि तीन-तीस सफरचंद असतील तर त्याच्याकडे काय असेल?
- त्याच्याकडे खूप हात असतील
३ - जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी हे अंतर रेल्वेने किती आहे
- रेल्वे मार्गाने जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचं अंतर हे ३ हजार ७११ किमी आहे
४ - कुणा अमेरिकन नागरिकाला भारतात का दफन करता येत नाही?
- कुठल्याही जिवंत अमेरिकन नागरिकाला भारतात दफन करता येत नाही.
५ - अशी कुठली भाषा आहे, जी खाण्यामध्ये वापरली जाते?
- चिनी
६ - असा कोणता फिश आहे, जो पाण्यात राहत नाही
- सेल्फिश