बोंबला! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी नको तो प्रयोग केला; थेट हॉस्पिटलात जाऊन पोहोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:49 IST2021-02-18T15:44:55+5:302021-02-18T15:49:12+5:30

Thailand : एका तरूणाने गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी जे केलं ते वाचून अंगावर शहारे येतील. हे इतकं वेगळं काहीतरी होतं ज्याचा तुम्हीच काय कुणीच कधी विचार केला नसेल.

Thai man stuck ring on his penis on valentine day to impress girlfriend landed in hospital | बोंबला! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी नको तो प्रयोग केला; थेट हॉस्पिटलात जाऊन पोहोचला!

बोंबला! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी नको तो प्रयोग केला; थेट हॉस्पिटलात जाऊन पोहोचला!

अनेक तरूण आपल्या गर्लफ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी नको नको ते करत असतात. काही लोक भारीतले कपडे घालतात, गर्लफ्रेन्डला महागडं गिफ्ट घेतात, तिला बाहेर जेवायला नेतात इत्यादी गोष्टी सामान्यपणे केल्या जातात. पण थायलॅंडमध्ये एका तरूणाने गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी जे केलं ते वाचून अंगावर शहारे येतील. हे इतकं वेगळं काहीतरी होतं ज्याचा तुम्हीच काय कुणीच कधी विचार केला नसेल. कधी कधी विचार न करता काही करणं किती महागात पडू शकतं याचंच हे उदाहरण आहे.

थायलॅंडमध्ये एका व्यक्तीने गर्लफ्रेन्डसमोर स्वत:ला अधिक आकर्षक दाखवण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टच्या वर एक रिंग घातली. या माथेफिरू रोमिओचं हे पाउल त्याच्या जीवावर बेतलं होतं. या तरूणाला प्रायव्हेट पार्टवर सूज आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. (हे पण वाचा : वाऱ्यामु‌ळे गरोदर झाल्याचा इंडोनेशियातील महिलेचा दावा, सोशल मीडियावर चर्चा)

डॉक्टरने बोल्ट कटरचा वापर करून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फसलेली रिंग कापून काढली. या तरूणाने आपातकालीन सेवेला सांगितलं की, त्याने प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवण्यासाठी ही रिंग घातली होती. जेणेकरून त्याला व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेन्डला खूश करता येईल. या तरूणी थायलॅंडची राजधानी बॅंकॉकचा राहणारा आहे. पण डॉक्टरांनी त्याच्या नावाचा खुलासा केलेला नाही.

प्रायव्हेट पार्ट वाढवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत. पण या तरूणाने आपल्या टूलबॉक्समधून ३ सेंटीमीटरा बोल्ट काढला आणि तोच वापरला. हा बोल्ट वापरताना त्याने बेबी ऑइल आणि लुब्रिकंटचा वापर केला. शुक्रवारी त्याने ही रिंग घातली होती आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सूज आली होती. (हे पण वाचा : जेवण करता करता ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं, १०० रुपयांत झाला कोट्यवधींचा मालक!)

या तरूणाने प्रायव्हेट पार्टमधून बोल्ट काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. अखेर त्याने आपातकालीन सेवेला बोलवलं. यादरम्यान दोन दिवस बोल्ट होता तिथेच होताच. रिंग काढल्यानंतर तरूण म्हणाला की, 'मला भीती वाटत होतं की, माझा प्रायव्हेट पार्ट कापावा लागू नये. त्यावर इतकी सूज आली होती की, असं वाटत होतं ते आता फुटेल'. आता रिंग या तरूणाने सुटकेचा निश्वास टाकलाय.
 

Web Title: Thai man stuck ring on his penis on valentine day to impress girlfriend landed in hospital