बाहेरून बघाल तर फक्त कन्टेनर आतून बघाल आलिशान घर, हे कमाल घर बघून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:24 IST2019-11-01T16:19:56+5:302019-11-01T16:24:18+5:30
आपल्या स्वप्नातील घर साकारणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण घर तयार करणं आणि सजवणं वाटतं तेवढं सोपं काम नसतं.

बाहेरून बघाल तर फक्त कन्टेनर आतून बघाल आलिशान घर, हे कमाल घर बघून व्हाल थक्क!
आपल्या स्वप्नातील घर साकारणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण घर तयार करणं आणि सजवणं वाटतं तेवढं सोपं काम नसतं. अनेकांचं आयुष्य निघून जातं एक घर उभारण्यात. पण असेही काही लोक आहेत जे त्यांचं स्वप्नातील घर काहीतरी वेगळी आयडिया लावून उभारतात.
टेक्सासच्या हॉस्टन शहरात राहणाऱ्या Will Breaux ने असंच काहीसं केलंय. त्याने विटा आणि सीमेंटऐवजी शिपिंग कन्टेनर्स ने घर तयार केलंय. जे बाहेरून दिसायला लाकडाच्या डब्यासारखं दिसतं पण आतून पाहिल्यावर थक्क करणारा नजारा दिसतो.
११ शिपिंग कन्टेनरपासून तयार ही ३ मजल्याची इमारत हॉस्टन शहरातील MacGowen Stresst व आहे. २५०० स्क्वेअर फूट परिसरात असलेलं हे घर पूर्णपणे फर्निश्ड आहे. हे हुबेहूब Will च्या स्वप्नातील घर आहे. या घराचं स्वप्न Will ने २००० साली पाहिलं होतं. जे प्रत्यक्षात तयार व्हायला बराच वेळ लागला.
Will चा विचार फार वेगळा होता. त्यामुळे त्याच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इंजिनिअरचा शोध घेणं फार अवघड गेलं. त्यामुळे त्याने स्वत: २०११ मध्ये हे घर उभारण्याचा निर्णय घेतला.
सर्वातआधी Will ने घराचं एक थ्रीडी स्केच तयार केलं आणि त्यानंतर घराचं काम सुरू केलं. आज तो ३ मजली इमारतीचा मालक आहे. Will ने कन्टेनरची निवड केली कारण कन्टेनर हे फार मजबूत असतात. त्यांवर आग, पाऊस आणि वादळाचा परिणाम होत नाही. तसेच ते वर्षानुवर्ष चालतात.