अमेरिकन प्रोफेसरचा अजब खळबळजनक दावा, मनुष्यांच्या वेशात पृथ्वीवर राहतात एलियन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:14 IST2022-03-31T13:14:12+5:302022-03-31T13:14:48+5:30
डॉक्टर डेविड जॅकब्स पेंसिलवेनियाच्या टेंपल यूनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचे प्रोफेसर आहे आणि ते यूफोलॉजीचे तज्ज्ञ आहेत.

अमेरिकन प्रोफेसरचा अजब खळबळजनक दावा, मनुष्यांच्या वेशात पृथ्वीवर राहतात एलियन्स!
मनुष्यांना दुसऱ्या ग्रहांबाबत आणि तिथे काय आहे हे जाणून घेण्यााबाबत नेहमीच उत्सुकता असते. वेगवेगळ्या ग्रहांबाबत सतत काहीना काही रिसर्च सुरू असतात. अशात अमेरिकन प्रोफेसर डॉक्टर डेविड जॅकब्स (Dr David Jacobs) यांनी एक अजब दावा केला आहे. ते म्हणाले की, एलियन्स (Aliens) मनुष्यांचं अपहरण करत आहेत आणि स्वत: पृथ्वीवर येत आहेत. या खळबळजनक दाव्याच्या समर्थनात त्यांनी अनेक तर्कही दिले आहेत.
डॉक्टर डेविड जॅकब्स पेंसिलवेनियाच्या टेंपल यूनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचे प्रोफेसर आहे आणि ते यूफोलॉजीचे तज्ज्ञ आहेत. डेविड यांनी दावा केला आहे की, त्यांनी अशा अनेक लोकांशी संवाद साधला ज्यांचं एलियन्सने अपहरण केलं होतं आणि ते वाचले. यासंबंधी एक डॉक्युमेंट्री Extraordinary: The Revelations या नावाने त्यांनी तयार केली. यात किती सत्य आणि किती भ्रम आहे हे आम्ही सांगू शकत नाही, पण त्यांचे दावे घाबरवणारे आहेत.
Daily Star च्या रिपोर्टनुसार, डेविड जॅकब्स यांचा दावा आहे की, एलियन्स पृथ्वीवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. पण त्याआधी ते मनुष्यांचं अपहरण करून त्यांचा माइंड कंट्रोल करत आहेत. त्यांच्यानुसार, मनुष्यांनी अनेक ठिकाणांवर आपला कब्जा केला आहे आणि आता एलियन्सना सुद्धा तेच करायचं आहे. त्यांनी दावा केला की, ते अशा अनेक लोकांसोबत बोलले ज्यांचं एलियन्सने अपहरण केलं होतं आणि एलियन्स त्यांना म्हणाले की, ते त्यांच्याकडून भविष्यात काम करून घेतील. अशा अनेक लोकांना सांगण्यात आलं की, त्यांना क्राउड कंट्रोल इन्स्ट्रक्शन दिले जाऊ शकतात.
डेविड जॅकब्स यांचा अजब दाव्यांपैकी एक असाही दावा आहे की, काही एलियन्स मनुष्यांसारखे दिसतात आणि ते पृथ्वीवर आले आहेत. ही माहितीही त्यांनी एलियन्सकडून अपहरण करण्यात आलेल्या लोकांच्या आधारावर दिली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, ते मनुष्यांसारखे दिसतात आणि ते शिकतात की, मनुष्यांमध्ये कसं रहायचं. ते सुपरह्यूमन आहेत आणि त्यांना आपल्याला कंट्रोल करायचं आहे. ते मनुष्यांचा मेंदू सहजपणे नियंत्रित करू शकतात. डेविड जॅकब्स यांनी ही सगळी माहिती BLAZE च्या UFO WEEK मध्ये येऊन सांगितली.