शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

चुकीला माफी नाही! गेंड्याच्या शिकारीचा प्लॅन पडला महागात, हत्तीच्या पायाखाली येऊन गमावला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 3:16 PM

क्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे(Rhino Poacher) , हत्ती(Elephant), सिंह (Lions), बिबटे (Leopards) आणि म्हशीसाठी (Buffaloes) प्रसिद्ध आहे.

चुकीला माफी नाही! गेंड्याच्या शिकारीचा प्लॅन पडला महागात, हत्तीच्या पायाखाली येऊन गमावला जीव!दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) सर्वात मोठ्या अभयारण्यांपैकी एक असलेल्या क्रूगर नॅशनल पार्कमधून (Kruger National Park) शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे गेंड्याच्या शिकारीसाठी आलेल्या तीन लोकांपैकी एकाचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला.. 

क्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे(Rhino Poacher) , हत्ती(Elephant), सिंह (Lions), बिबटे (Leopards) आणि म्हशीसाठी (Buffaloes) प्रसिद्ध आहे. या नॅशनल पार्काच्या फाबेनी भागात शनिवारी वनसंरक्षकांना तीन लोक दिसून आले होते. ते गेंड्यांच्या शिकारीसाठी आल्याचा त्यांना संशय होता. वनसंरक्षकांच्या नजरेत पडल्यावर तिघांनीही तिथून पळ काढला. ते लपण्यासाठी हत्तींच्या कळपात शिरले. त्यात मोठे हत्ती आणि पिल्लंही होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

तीन लोकांपैकी एकाला नंतर वनरक्षकांनी अटक केली होती. आपला एक साथीदार मरण पावला असल्याची शक्यता त्याने पोलिसांकडे वर्तवली होती. त्यानंतर वनसंरक्षकांनी त्याच्यासह ते तिघे ज्या मार्गावरून गेले होते, त्या मार्गावर पुन्हा फिरून शोध घेतला. त्या वेळी, हत्तींनी पायदळी तुडवल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीला मृतदेह सापडला. दरम्यान, एक जण या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

शिकाऱ्याकडून एक रायफल, कुऱ्हाडी ठेवलेली एक बॅग आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यावरून ते गेंड्यांची शिकार करण्यास आल्याचं स्पष्ट होतं, असं अधिकाऱ्यांनी एबीसी न्यूजला सांगितलं. क्रूगर नॅशनल पार्कचे व्यवस्थापकीय अधिकारी गॅरेथ कोलमन म्हणाले की, ' नॅशनल पार्कमध्ये घडलेला मृत्यू दुर्दैवी आहे; मात्र क्रूगर नॅशनल पार्कमधल्या गेंड्यांची शिकार केवळ टीमवर्क आणि शिस्तबद्धतेतूनच थांबवता येऊ शकते. शिकारीमुळे, तस्करीमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात. तसंच ज्या साधनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकास होऊ शकतो, तेच दावणीला बांधले जातात,' असं कोलमन यांनी निवेदनात म्हटलं आहे. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय