शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'मेरे देश की धरती सोना उगले'... हे शब्द खरे ठरणार! पृथ्वीच्या गर्भातून सोनं वर येतंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:56 IST

Gold : अलिकडेच वैज्ञानिकांनी एक दावा केला आहे की, पृथ्वी आपल्या कोरमधून सोनं आणि इतर मौल्यवान धातू वर ढकलत आहे.

Gold : ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’ हे हिंदी सिनेमातील गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच. या गाण्याचा गर्भीतार्थ धान्याशी होता. मात्र, आम्ही तुम्हाला सांगितलं की, आता खरंच जमीन सोनं ओकणार आहे तर...? कारण अलिकडेच वैज्ञानिकांनी एका रिसर्चमध्ये याबाबत एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. एका रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, सोनं जमिनीच्या वर येणं सुरू झालं आहे. जर्मनीच्या गॉटिंगन यूनिव्हर्सिटीमध्ये वैज्ञानिकांच्या एका टीमनं अमेरिकेतील काही बेटांवरील ज्वालामुखीचा अभ्यास केला. यादरम्यान जे समोर आलं ते एका मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आलंय.

पृथ्वीच्या आत सोनं

अलिकडेच वैज्ञानिकांनी एक दावा केला आहे की, पृथ्वी आपल्या कोरमधून सोनं आणि इतर मौल्यवान धातू वर ढकलत आहे. सायन्स अलर्टच्या रिपोर्टमध्ये आढळून आलं आहे की, पृथ्वीच्या कोरमधून सोनं आणि इतर धातू वर येत आहेत. या रिपोर्टचा अंदाज आहे की, पृथ्वीतीली 99.99 टक्क्यांपेक्षा जास्त सोनं आणि किंमती धातू 3000 किलोमीटरच्या एका दगडाखाली बदलं आहे. टीमला जेव्हा या तत्वांची माहिती घेतली तर यादरम्यान वैज्ञानिकांना मौल्यवान धातू आइसोटोपचं प्रमाण खूप जास्त आढळलं. यातून हे समोर आलं की, ज्वालामुखीतून जो लाव्हा बाहेर येत आहे, तो मुळात पृथ्वीच्या कोरमध्ये आहे.

कुठून आलं सोनं?

गॉगिंटेन यूनिव्हर्सिटीमध्ये सुरूवातीचे रिपोर्ट आल्यावर वैज्ञानिकांना जाणवलं की, त्यांनी खरंच पृथ्वीमधील सोनं शोधलं. ते म्हणाले की, पृथ्वीच्या कोरमधून जे काही बाहेर येऊन मेंटलमध्ये लीक होत आहे, त्यात सोनं आणि इतर धातू आहेत. स्टडीमधून हेही समोर आलं की, जगात शोधलं गेलेलं सोनं आणि धातू मुळात पृथ्वीच्या आतच तयार झालेले असू शकतात.

जमिनीपासून किती दूर आहे सोनं?

पृथ्वीमधून ज्या जागी सोनं आणि इतर मौल्यवान धातून बाहेर येत आहेत ते पृथ्वीच्या कोरमधून येत आहे. हा कोर जमिनीपासून जवळपास 2900 किलोमीटर खाली आहे. पृथ्वीचा कोर दोन भागात विभागलेला आहे. बाहेरील भाग जो जवळपास 2900 ते 5150 किलोमीटर खोलवर आहे. तर दुसरा भाग जो आतील भाग आहे तो 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर खोलवर आहे.

टॅग्स :GoldसोनंEarthपृथ्वीResearchसंशोधन