...म्हणून ऑनलाइन क्लासेससाठी रोज डोंगरावर जाऊन बसतो 'हा' विद्यार्थी, कधी तर पोहोचेपर्यंत संपतो क्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:28 PM2020-07-15T16:28:39+5:302020-07-15T16:33:37+5:30

कोरोनामुळे अनेक शाळांनी ऑनलाइन क्लासेस सुरू केलेत. पण सगळ्यांना याचा फायदा होतोय असं नाही. अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

Student climbing the mountain everyday for online class due to lack of network | ...म्हणून ऑनलाइन क्लासेससाठी रोज डोंगरावर जाऊन बसतो 'हा' विद्यार्थी, कधी तर पोहोचेपर्यंत संपतो क्लास!

...म्हणून ऑनलाइन क्लासेससाठी रोज डोंगरावर जाऊन बसतो 'हा' विद्यार्थी, कधी तर पोहोचेपर्यंत संपतो क्लास!

Next

कोरोनामुळे आता गेल्या काही महिन्यांपासून शाळा बंद आहेत. नुकतेच अनेक शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. पण सगळ्यांनाच ऑनलाईन क्लासेसमध्ये सामिल होणं जरा अवघड जातंय. काही विद्यार्थ्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतोय. कारण अनेक शहरांमध्ये इंटरनेटची व्यवस्था ठिक नाही. नेटवर्कसाठी उंच ठिकाणांवर जावं लागतंय. म्हणजे घराच्या छतावर, पाण्याच्या टाकीवर इतकेच काय तर डोंगराच्या टोकावर जावं लागतं. अनेकदा तर नेटवर्क मिळेपर्यंत क्लासेस संपतात.

ही घटना आहे बाडमेर राजस्थानच्या दरूडा गावातीव भीलो वस्तीतील. इथे हरिश नावाच्या एका विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासेससाठी रोज थेट डोंगरावर चढून जावं लागतं. तो जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने डोंगरावरत टेबल आणि खुर्ची लावून ठेवली आहे. हरिशचे वडील वीरमदेव यांनी दैनिक भास्करला सांगितले की, हरिश गेल्या दीड महिन्यापासून रोज सकाळी ८ वाजता डोंगरावर जातो आणि क्लास संपल्यावर दोन वाजता घरी परततो.

तेच बनासकांठा जिल्ह्यातील अमीरगढ आणि दांता तालुक्यातील सुदूर भागात तर मुलांकडे लॅपटॉ़प आणि डेस्कटॉपची सुविधाही नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल तर आहेत पण चांगलं नेटवर्क नसल्याने काहीच फायदा नाही. ही स्थिती अनेक गावातील आहे.

धनपुरा येथील एका विद्यार्थी राहुल गामरने सांगितले की, मी छतावर आणि झाडांवर मोबाइल नेटवर्कसाठी चढत असतो. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. इथे ऑनलाईन क्लासेस अशक्य आहेत'.  हीच समस्या देेशातील अनेक गावातील आहे. अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीयेत. अशात त्यांचं भविष्य कसं असेल हे कुणीही सांगू शकणार नाही.
 

Web Title: Student climbing the mountain everyday for online class due to lack of network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.