विचित्र घटना; 10 लाखांच्या गाडीत आले अन् 150 रुपयांचे मीठ चोरून नेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 21:08 IST2023-06-01T21:08:11+5:302023-06-01T21:08:50+5:30

या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

strange occurrences; Came in a car worth 10 lakhs and stole salt worth Rs 150... | विचित्र घटना; 10 लाखांच्या गाडीत आले अन् 150 रुपयांचे मीठ चोरून नेले...

विचित्र घटना; 10 लाखांच्या गाडीत आले अन् 150 रुपयांचे मीठ चोरून नेले...


सोनं-चांदी, रोख रक्कम आणि महागड्या वस्तू चोरीच्या अनेक लहान-मोठ्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र मध्य प्रदेशातील चोरीच्या विचित्र घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. येथील एका दुकानातून 150 रुपये किमतीचे मीठ चोरीला गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरी करणारे 10 लाख रुपये किमतीच्या कारमधून आले होते. 

भिंड जिल्ह्यात रात्री उशिरा ही घटना घडली. तेथील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चार तरुण कारजवळ बसून बोलत असल्याचे दिसत आहे. यावेळी एक तरुण मीठाची तीन पोती उचलून गाडीच्या ट्रंकमध्ये टाकतो. हा व्हिडीओ लहार शहरातील बाजारपेठेतील आहे.  अद्याप याप्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही. पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज मिळाली असून, त्याआधारे पोलीस कारचा शोध घेत आहेत.

Web Title: strange occurrences; Came in a car worth 10 lakhs and stole salt worth Rs 150...