VIDEO : बॉयफ्रेन्डसोबत गात होती गाणं, तेव्हाच केसांना लागली आग आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:15 IST2020-12-29T16:12:58+5:302020-12-29T16:15:24+5:30

गायक आणि गीतकार Sofia Ellar ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनला लिहिले की, '२०१९, आम्ही ठीक आहोत.

Sofia Ellar accidentally sets her hair on fire while singing with boyfriend in Spain | VIDEO : बॉयफ्रेन्डसोबत गात होती गाणं, तेव्हाच केसांना लागली आग आणि....

VIDEO : बॉयफ्रेन्डसोबत गात होती गाणं, तेव्हाच केसांना लागली आग आणि....

काही दिवसांपूर्वीच ख्रिसमस साजरा झाला. आता लोकांना न्यू इयरची प्रतिक्षा आहे. पण कोरोना महामारीमुळे २०२१ च्या स्वागताचं सेलिब्रेशन फिक्क होणार आहे. पण हे वर्ष जाता जाताही काही लोकांसाठी चांगलं ठरत नाहीये. आता हेच बघा ना स्पेनमध्ये एक लेडी सिंगर आपल्या बॉयफ्रेन्डसोबत गाणं गात होती. तेव्हाच अचानक तिच्या केसांना आग लागली. आणि दोघांचा आनंद दु:खात बदलला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गायक आणि गीतकार Sofia Ellar ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनला लिहिले की, '२०१९, आम्ही ठीक आहोत. २०२० आम्ही आग लावली आणि ड्रिंक्स फेकलं. हेलो २०२१'. आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाख ३० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओत बघू शकता की, गायिका  सोफिया स्टूलवर बसून गाणं गात आहे आण तिचा बॉयफ्रेन्ड गिटार वाजवत आहे. दरम्यान अचानक सोफियाच्या केसांना मागे पेटत असलेल्या मेणबत्तीने आग लागते. जशी तिला याची जाणीव होते ती आणि तिचा बॉयफ्रेन्ड आग विझवण्याचा प्रयत्न करतो.
 

Web Title: Sofia Ellar accidentally sets her hair on fire while singing with boyfriend in Spain