सलग ६० तास झोपला २८ हजार जिंकला, सोबतच डिनर-राफ्टिंग फ्री; पाहा नक्की काय आहे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 20:05 IST2022-08-27T20:04:02+5:302022-08-27T20:05:38+5:30
एका विचित्र स्पर्धेत स्पर्धकाला झोपण्याचा टास्क देण्यात आला. जो जास्त वेळ झोपणार, तो या स्पर्धेचा विजेता घोषित केला जाणार होता.

सलग ६० तास झोपला २८ हजार जिंकला, सोबतच डिनर-राफ्टिंग फ्री; पाहा नक्की काय आहे प्रकार
एका विचित्र स्पर्धेत स्पर्धकाला झोपण्याचा टास्क देण्यात आला. जो जास्त वेळ झोपणार, तो या स्पर्धेचा विजेता घोषित केला जाणार होता. एका व्यक्तीनं ही स्पर्धा सहज जिकली. हा विजेता स्पर्धत दोन चार नाही, तर तब्बल साठ तास जमिनीवर झोपून होता. याप्रकारे त्यानं 'Lying Down Championship’चं विजेतेपद पटकावलं.
ही स्पर्धा युरोपियन देश मोंटेनेग्रोच्या ब्रेंजा या गावात आयोजित करण्यात आली होती. ज्यानं ही स्पर्धा जिंकली त्याचं नाव Žarko Pejanović असं आहे. त्याला बक्षीस म्हणून २८ हजार रूपये देण्यात आले. तसंच रेस्तराँमध्ये दोन जणांना जेवण्याचीही संधी दिली. याशिवाय त्याला गावात विकेंड स्टेदेखील देण्यात आला, या ठिकाणी त्याला राफ्टिंगचाही आनंद घेता येऊ शकणार आहे.
एका पार्कमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. Žarko Pejanović सोबत आणखी ९ स्पर्धकही सहभागी झाले होते. परंतु एकानंतर एक असं करून इतरांनी पराभव स्वीकारला. या स्पर्धेत काही वर्षांपूर्वी एक नियम लागू झाला. ज्या अंतर्गत स्पर्धक व्यक्ती ८ तासांनंतरच टॉयलेटला जाऊ शकतो. हा नियम लागू झाल्यानंतर Dubravka Aksic या महिलेने ४ दिवस २१ तास झोपून काढत मोठा रेकॉर्ड केला होता. तर जेव्हा या नियम लागू नव्हता तेव्हा ५२ तासांचा रेकॉर्ड झाला होता. Radoje Blagojevic नावाच्या एका व्यक्तीनं या स्पर्धेची सुरूवात केली होती.