शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:22 IST

सध्या सोशल मीडियावर या अमेरिकन मॉडेलची जोरदार चर्चा आहे. तिने तिच्या फॉलोअर्सला एक जबरदस्त ऑफर दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

लग्नाविषयी प्रत्येकाची आपापली स्वप्न आणि मतं असतात. आयुष्यातील हे सगळ्यात मोठे पाऊल उचलताना जोडीदार कसा असावा, याविषयी देखील अनेकांच्या मनात आधीच कल्पना असतात. आता तुमच्या-आमच्या सारखंच एका प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारने देखील लग्नाचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या चाहत्यांना योग्य वर शोधून देण्याची मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या अमेरिकन मॉडेलची जोरदार चर्चा आहे. ३३ वर्षांची एला बे एरिया ही मॉडेल कॅलिफोर्निया येथे राहते आणि तिला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. यासाठी तिने तिच्या फॉलोअर्सला एक जबरदस्त ऑफर दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

मॉडेल आणि ओन्लीफॅन्स स्टार असलेल्या एलाने गेल्या महिन्यात जाहीर केलं की, तिला लग्न करायचं आहे आणि जो कोणी तिला योग्य वर शोधून देईल, त्याला ती मोठी रक्कम बक्षीस म्हणून देईल. एला म्हणाली, "जर तुम्ही मला सुयोग्य मुलगा सुचवला आणि मी त्याच्याशी लग्न केलं, तर मी तुम्हाला $१००,००० (जवळपास ८८ लाख) देईन. आणि जर कोणी मला गर्भधारणेसाठी योग्य व्यक्ती शोधून दिली, तर मी त्याला $३००,००० (जवळपास ₹२.५ कोटी) देईन."

‘मिस्टर परफेक्ट’ च्या शोधात एला!आता तुम्हाला वाटेल की, मुलगा शोधणं अगदी सोपं आहे. पण थांबा, आधी तिच्या अटी तर जाणून घ्या. एला म्हणाली की, तिच्यासाठी ‘मिस्टर परफेक्ट’ शोधणं खूप अवघड आहे. तिला असा पुरुष हवा आहे जो तिच्यासारखाच आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, जो लैंगिकतेबद्दल मोकळ्या विचारांचा असेल, ज्याला मुलं हवी असतील आणि जो स्वतःला पूर्णपणे स्वीकारत असेल. सध्या एलाचा एक प्रियकर आहे, ज्याला तिने चाहत्यांसमोर आणले होते. ते गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत. पण आता तिला ‘पती’ची गरज आहे.

एलाच्या या अटींमुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण, तिने हे देखील स्पष्ट केलंय की, असे विचार असलेला माणूस शोधणं सध्या खूप कठीण आहे. त्यामुळेच ती तिच्या नशिबाची परीक्षा घेत आहे आणि लोकांकडे मदत मागत आहे. एलाच्या या अनोख्या ऑफरमुळे आता चाहते तिच्यासाठी असाच मुलगा शोधत आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके