सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:22 IST2025-09-08T14:16:36+5:302025-09-08T14:22:26+5:30
सध्या सोशल मीडियावर या अमेरिकन मॉडेलची जोरदार चर्चा आहे. तिने तिच्या फॉलोअर्सला एक जबरदस्त ऑफर दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
लग्नाविषयी प्रत्येकाची आपापली स्वप्न आणि मतं असतात. आयुष्यातील हे सगळ्यात मोठे पाऊल उचलताना जोडीदार कसा असावा, याविषयी देखील अनेकांच्या मनात आधीच कल्पना असतात. आता तुमच्या-आमच्या सारखंच एका प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारने देखील लग्नाचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या चाहत्यांना योग्य वर शोधून देण्याची मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या अमेरिकन मॉडेलची जोरदार चर्चा आहे. ३३ वर्षांची एला बे एरिया ही मॉडेल कॅलिफोर्निया येथे राहते आणि तिला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. यासाठी तिने तिच्या फॉलोअर्सला एक जबरदस्त ऑफर दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
मॉडेल आणि ओन्लीफॅन्स स्टार असलेल्या एलाने गेल्या महिन्यात जाहीर केलं की, तिला लग्न करायचं आहे आणि जो कोणी तिला योग्य वर शोधून देईल, त्याला ती मोठी रक्कम बक्षीस म्हणून देईल. एला म्हणाली, "जर तुम्ही मला सुयोग्य मुलगा सुचवला आणि मी त्याच्याशी लग्न केलं, तर मी तुम्हाला $१००,००० (जवळपास ८८ लाख) देईन. आणि जर कोणी मला गर्भधारणेसाठी योग्य व्यक्ती शोधून दिली, तर मी त्याला $३००,००० (जवळपास ₹२.५ कोटी) देईन."
‘मिस्टर परफेक्ट’ च्या शोधात एला!
आता तुम्हाला वाटेल की, मुलगा शोधणं अगदी सोपं आहे. पण थांबा, आधी तिच्या अटी तर जाणून घ्या. एला म्हणाली की, तिच्यासाठी ‘मिस्टर परफेक्ट’ शोधणं खूप अवघड आहे. तिला असा पुरुष हवा आहे जो तिच्यासारखाच आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, जो लैंगिकतेबद्दल मोकळ्या विचारांचा असेल, ज्याला मुलं हवी असतील आणि जो स्वतःला पूर्णपणे स्वीकारत असेल. सध्या एलाचा एक प्रियकर आहे, ज्याला तिने चाहत्यांसमोर आणले होते. ते गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत. पण आता तिला ‘पती’ची गरज आहे.
एलाच्या या अटींमुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण, तिने हे देखील स्पष्ट केलंय की, असे विचार असलेला माणूस शोधणं सध्या खूप कठीण आहे. त्यामुळेच ती तिच्या नशिबाची परीक्षा घेत आहे आणि लोकांकडे मदत मागत आहे. एलाच्या या अनोख्या ऑफरमुळे आता चाहते तिच्यासाठी असाच मुलगा शोधत आहेत.