Jara hatke: ...म्हणून जिवंत असल्याचे पुरावे घेऊन अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला हा तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 06:03 PM2021-09-17T18:03:17+5:302021-09-17T18:04:51+5:30

Jara hatke News: बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली आहे.

... So the young man stood before the authorities with proof that he was alive | Jara hatke: ...म्हणून जिवंत असल्याचे पुरावे घेऊन अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला हा तरुण

Jara hatke: ...म्हणून जिवंत असल्याचे पुरावे घेऊन अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला हा तरुण

googlenewsNext

पाटणा - बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली आहे. ही घटना समोर येताच अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहे. तसेच रुग्णालयातून समोर आलेल्या प्रकाराबाबत चौकशीसाठी आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे बिहारमध्ये सरकारी आकडेवारीनुसार सुमारे ९ हजार ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गामुळे मरणाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एक जिल्हावार यादी तयार करण्यात आली आहे. तसेच ही यादी कोविड पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. मात्र बेतियामधील जीएमसीएचमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी एका अशा व्यक्तीचे नाव या यादीत टाकले. जी जिवंत आहे. तसेच आपले काम करत आहे.

प्रत्यक्षात या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र नंतर ते कोरोनामुक्त होऊन घरी गेले होते. यादरम्यान, गेल्या महिन्यात बेतिया अंचल कार्यालयातून सीआय आणि सीओचा फोन आल्यानेत्यांवना धक्का बसला. भारत सरकारच्या सेल कंपनीत ज्युनियर टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या चंद्रशेखर पासवान यांना त्यांच्या वारसांशी बोलायचे आहे, असा फोन आला. मात्र चंद्रशेखर पासवान यांनी ते आश्रित नाहीत तर स्वत: चंद्रशेखर पासवान आहेत, असे सांगितले तेव्हा समोरच्या अधिकाऱ्यालाही धक्का बसला.

मुळचे खगडिया येथील रहिवासी असलेले चंद्रशेखर पासवान हे छावनी परिसरात भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. येथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना असा फोन आला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना जाऊन आपण जिवंत असल्याची कागदपत्रे दाखवली. याबाबत जीएमसीएच रुग्णालयाचे उपाधीक्षक श्रीकांत दुबे यांनी सांगितले की, एकाच नावाच्या दोन व्यक्तींमुळे चुकून त्यांचे नाव यादीत आले. आता ही चूक सुधारण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांनी ही चूक केली, त्यांच्यावर तपासानंतर कारवाई करण्यात येईल.  

Web Title: ... So the young man stood before the authorities with proof that he was alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.