मेल्यानंतरही सापात विष असतं का आणि तो दंश करू शकतो का? पाहा काय सांगतात एक्सपर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:22 IST2026-02-06T10:54:05+5:302026-02-06T11:22:16+5:30
Snake Venom Facts : काही लोकांना असं वाटतं की, सापांच्या हाडांमध्ये सुद्धा विष असतं. अशात जर चुकून त्यावर पाय दिला तर आपला जीव जाऊ शकतो असा समज आहे.

मेल्यानंतरही सापात विष असतं का आणि तो दंश करू शकतो का? पाहा काय सांगतात एक्सपर्ट
Snake Venom Facts : जगभरात दरवर्षी विषारी सापांच्या दंशाने लाखो लोकांचा जीव जातो. याच कारणाने अनेक एक्सपर्ट लोकांना सापांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण सापाने दंश मारणं ही एक मेडिकल इमरजन्सी आहे आणि वेळीच जर उपचार मिळाला नाही तर व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. काही साप विषारी असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही लोकांना असं वाटतं की, सापांच्या हाडांमध्ये सुद्धा विष असतं. अशात जर चुकून त्यावर पाय दिला तर आपला जीव जाऊ शकतो असा समज आहे. यात किती तथ्य आहे हे आज आपण समजून घेणार आहोत.
खरंच सापांच्या हाडांमध्ये विष असतं?
ज्या लोकांना वाटतं की, सापांच्या हाडांमध्येही विष असतं. ते चुकीचा विचार करत आहेत. मुळात सापांचं विष हे विष ग्रंथींमध्ये असतं, जी त्याच्या तोंडात आणि डोळ्यांच्या मागे असते. जेव्हा साप एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला दंश करतो, तेव्हा त्याचे समोरचे दात व्यक्तीमध्ये हळूहळू विष सोडत असतात.
मेल्यानंतरही सापात विष असतं का?
हो हे खरंय...एक मेलेला साप किंवा मुंडकं छाटलेला साप मेल्यानंतरही अनेक तासांनंतर विष सोडू शकतो. मेल्यानंतर साप दंश करू शकतो, कारण त्याच्या विष ग्रंथींमध्ये काही प्रमाणात विष शिल्लक असतं. अशात जर कुणी मेलेल्या सापावर पाय ठेवत असेल किंवा त्याच्या त्वचेच्या संपर्कात येत असेल तर शक्यता आहे की, व्यक्तीच्या शरीरात विष प्रवेश करू शकतं. अशात सल्ला दिला जातो की, जर कुठे मेलेला साप दिसला तर त्याच्यापासून दूरच रहावं.
मेलेला साप दंश करू शकतो का?
एक मेलेला सापही दंश करू शकतो आणि विष पसरवू शकतो. काही संशोधनानुसार, मेल्यानंतरही सापाच्या शरीरात रिफ्लेक्सेस अनेक तासांपर्यंत काम करत असतात, ज्यामुळे तो उत्तेजित झाल्यावर दंश करू शकतो. आसाममध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कोब्रा आणि करेतसारखे विषारी मेल्यानंतर तासांनीही दंश केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सापाने दंश केल्यावर कसं वाटतं?
जर एखाद्या व्यक्तीला सापाने दंश केला, ते जोरात वेदना होतात. वेदना वाढतच जातात. तसेच जमखेवर सूज येते आणि तो भाग निळा होतो. व्यक्तीला चक्कर येते, मळमळ होते आणि अस्वस्थता जाणवते. सोबतच धुसर दिसतं आणि श्वास घेण्यास त्रास होतो.