बापरे! सापाने गिळलेला अख्खा टॉवेल डॉक्टरांनी काढला कसा ? व्हिडीओ व्हायरल.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:05 IST2020-02-28T12:01:01+5:302020-02-28T12:05:12+5:30

हा साप सापडला त्यावेळी त्याचं वजन खूपचं वाढलेलं होतं. नंतर त्या सापाला प्राण्याच्या दवाखान्यात नेण्यात आलं.

Snake eats towel in austolia on the beach myb | बापरे! सापाने गिळलेला अख्खा टॉवेल डॉक्टरांनी काढला कसा ? व्हिडीओ व्हायरल.....

बापरे! सापाने गिळलेला अख्खा टॉवेल डॉक्टरांनी काढला कसा ? व्हिडीओ व्हायरल.....

सापाचा विचार करून सुद्धा जीव घाबराघुबरा होतो. सापाच्या फाईटींगचे आणि डान्सिंगचे अनेक किस्से तुम्हाला माहित असतील. पण तुमचा विश्वास बसणार नाही आज आम्ही तुम्हाला जो व्हिडीयो दाखवणार आहोत. त्या व्हिडीओमध्ये चक्क सापाने टॉवेल खाल्ला आहे. असं वाचून तुम्हाला वाटेल की छोटासा रूमाल गिळला असेल पण असं नाही. या १८ वर्षांच्या सापाने चक्क मोठ्याच्या मोठा टॉवेलच गिळला आहे.

हा टॉवेल काढण्यासाठी डॉक्टारांना कसे प्रयत्न केले हे या व्हिडीयोतून दिसून येत आहे. ही गोष्ट ऑस्टेलियामधिल आहे.  या साप समुद्रकिनारी सापडला असून ज्यावेळी हा साप सापडला त्यावेळी त्याचं वजन खूपचं वाढलेलं होतं. नंतर त्या सापाला प्राण्याच्या दवाखान्यात नेण्यात आलं.

SASH Avian & Exotics यांनी  सापाची ट्रिटमेंट केली आहे.  या सापाच्या पोटातून टॉवेल निघाला आहे. हा टॉवेल समुद्रकिनारी सापाने गिळल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या या सापाची प्रकृती व्यवस्थित आहे.  ( हे पण वाचा-एक नंबर जुगाड! जेसीबीचा असा वापर पाहून कंपनीचा मालक डोकं फोडून घेईल...)

Web Title: Snake eats towel in austolia on the beach myb