या व्यक्तीला वेगवेगळ्या सापांनी १७२ वेळा मारला होता दंश, तरी वाचला जीव; जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 04:11 PM2021-09-13T16:11:50+5:302021-09-13T16:15:58+5:30

२० वेळा तर असं झालं की सापाने दंश मारल्याने त्यांची हालत गंभीर झाली होती. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला.

Snake bitten researcher bill haast one hundred seventy two times but he survived | या व्यक्तीला वेगवेगळ्या सापांनी १७२ वेळा मारला होता दंश, तरी वाचला जीव; जाणून घ्या कसा

या व्यक्तीला वेगवेगळ्या सापांनी १७२ वेळा मारला होता दंश, तरी वाचला जीव; जाणून घ्या कसा

googlenewsNext

अमेरिकेतील प्रसिद्ध रिसर्चर बिल हास्ट आपल्या थरारक कारनाम्यांसाठी जगभरात प्रसिद्ध होते. बिल हास्ट एक रिसर्चर ते साप पकडणारे बनले. असं सांगितलं जातं की, त्यांना १७२ सापांनी दंश मारला. २० वेळा तर असं झालं की सापाने दंश मारल्याने त्यांची हालत गंभीर झाली होती. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला.

वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, एकेकाळी बिल हास्ट यांच्याकडे पाच-दहा साप होते. त्यांच्याकडे समुद्री साप, टायगर स्नेक कोब्रा, रॅटल्स स्नेक आणि वायपर स्नेक होते. ते ग्लव्ह्स न घालताही सापांना हाताने पकडत होते. ते सापांचं तोंड दाबून त्यांचं विष काढत होते. ज्याचा वापर ते मेडिकल रिसर्चसाठी करत होते.

बिल हास्ट हे जेव्हा १२ वर्षांचे होते तेव्हा त्यांना सापाने पहिल्यांदा दंश मारला होता. त्यांना पहिल्यांदा डायमंड ब्लॅक रॅटलर सापाने दंश मारला होता. बालपणापासूनच त्यांना सापांची आवड होती. त्यावेळी ते अमेरिकेतील फ्लोरिडायमध्ये राहत होते.

१७२ सापांनी दंश मारल्यावर जिवंत कसे?

बिल हास्ट यांनी आपल्या शरीरात इम्युनिटी निर्माण करण्यासाठी Mithridatism टेक्नीकचा वापर केला होता. यात व्यक्तीला निश्चित प्रमाणात वेळोवेळी विष दिलं जातं. याने व्यक्तीचा मृत्यू होत नाही तर त्यांच्या शरीरात सापाच्या विषाविरोधात अॅंटीबॉडी तयार  होतात.

दरम्यान दहा वर्षापूर्वी १०० वयाचे असताना बिल हास्ट यांचं निधन झालं. त्यांचं निधन नैसर्गिक कारणामुळे झालं. पण सापांच्या रिसर्चसाठी त्यांना आजही आठवलं जातं.
 

Web Title: Snake bitten researcher bill haast one hundred seventy two times but he survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.