घरातच खेळत होती १८ महिन्यांची चिमुकली, खेळणं पाहताच वडिलांना फुटला दरदरुन घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 19:39 IST2021-09-29T19:12:19+5:302021-09-29T19:39:40+5:30

अमेरिकेतील एक चिमुकली खतरनाक खेळ खेळत होती. जो पाहून तिच्या वडिलांनाही घाम फुटला. ही चिमुकली कोणत्या खेळण्यासोबत नाही तर चक्क मृत्यूसोबतच खेळत होती.

small girl was playing with poisonous spider father got shocked when he saw that | घरातच खेळत होती १८ महिन्यांची चिमुकली, खेळणं पाहताच वडिलांना फुटला दरदरुन घाम

घरातच खेळत होती १८ महिन्यांची चिमुकली, खेळणं पाहताच वडिलांना फुटला दरदरुन घाम

लहान मुलं खेळत (Children) असताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कधी कधी खेळता खेळता एखादी छोटीशी वस्तू ते नाकातोंडात घालतात (Kids playing). तर कधी अशा गोष्टीसोबत खेळतात जे त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. अशीच अमेरिकेतील एक चिमुकली खतरनाक खेळ खेळत होती. जो पाहून तिच्या वडिलांनाही घाम फुटला.

एरिझोनाच्या टक्सनमध्ये राहणारा ३६ वर्षांचा डेव्हिड लेहमॅन आपल्या १८ महिन्यांच्या चिमुकलीला खेळताना पाहून हादरलाच.कारण त्याची चिमुकली कोणत्या खेळण्यासोबत नाही तर चक्क मृत्यूसोबतच खेळत होती.

मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार डेव्हिडचं कुटुंब  बॅकयार्डमध्ये दुपारच्या वेळी आराम करत होतं. तिथंच डेव्हिडची लहान मुलगी खेळत होती. खेळता खेळता तिने उत्साहात आपल्या वडिलांना हाक मारली. 'डॅडी किडा' असं ओरडली. डेव्हिडला वाटलं छोटासा कोणता तरी किटक असेल. पण जेव्हा त्याने स्वतः तो किटक पाहिला तेव्हा तो हादरला. कारण ज्याच्यासोबत त्याची मुलगी खेळत होती. तो एक कोळी होता आणि तो साधा कोळी नव्हे तर चक्क टारेंट्युला  (Tarantula) होता, जो विषारी कोळी होता. सामान्यपणे उष्ण ठिकाणी हा कोळी दिसून येतो.

विषारी कोळ्यासोबत आपल्या मुलीला पाहून डेव्हिड घाबरलाच. तो मोठ्याने ओरडला आणि त्याने लगेच आपल्या मुलीला त्या कोळ्यापासून दूर खेचून घेतलं आणि नंतर त्या कोळ्याला पकडून दुसरीकडे सोडलं.

Web Title: small girl was playing with poisonous spider father got shocked when he saw that