दीराचं दुसऱ्या तरूणीसोबत होणार होतं लग्न, त्याच्या प्रेमात असलेल्या वहिनीने उघड केलं गुपित आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:27 IST2023-03-22T17:26:48+5:302023-03-22T17:27:29+5:30
Dever Bhabhi Shocking News : इथे विवाहित आणि काही मुलांची आई असलेल्या महिलेने 6 वर्ष आपल्या दीरासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि नंतर तिला त्याच्यासोबत कुठेतरी दूर जाऊन रहायचं होतं.

दीराचं दुसऱ्या तरूणीसोबत होणार होतं लग्न, त्याच्या प्रेमात असलेल्या वहिनीने उघड केलं गुपित आणि मग...
Dever Bhabhi Shocking News : अनैतिक संबंधातून घडणाऱ्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. इतकंच काय तर विवाहित असूनही काही महिला दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवतात आणि नंतर जबरदस्ती केल्याचा आरोपही करतात. सुरूवातीला तर त्यांच्यात सगळं काही चांगलं चाललेलं असतं. पण नंतर तेच एकमेकांचे वैरी ठरतात. त्यांचं गायब होतं. मग कोर्टात केसेही चालतात.
अशीच एक घटना कैथल जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे विवाहित आणि काही मुलांची आई असलेल्या महिलेने 6 वर्ष आपल्या दीरासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि नंतर तिला त्याच्यासोबत कुठेतरी दूर जाऊन रहायचं होतं. यासाठी ती आपल्या दीरासोबत 12 तारखेला पळून गेली.
तीन दिवस दोघेही वेगवेगळ्या ठिकाणावर राहिले आणि नंतर दीर 15 तारखेला तिला पुन्हा घरी घेऊन आला. जेव्हा तिला समजलं की, तिचा दीर दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करत आहे तर तेव्हा रागावून महिलेने दीराविरोधात रेपचा गुन्हा दाखल केला.
पीडितेने ज्या दीराविरोधात रेपची तक्रार दाखल केली आहे तो अविवाहित आहे आणि त्याचं लग्न होणार होतं. पण आता त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी फिरत आहे.
कैथल महिला पोलीस स्टेशनच्या गीता देवी यांनी सांगितलं की, काल त्यांच्याकडे एका रेप पीडितेची तक्रार आली होती. ज्यानंतर पीडितेच्या जबाबनुसार, तिचं मेडिकल करण्यात आलं. आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. लवकरच त्याला पकडलं जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.